IMPIMP

जर पसंत नसेल Aadhaar Card वरील फोटो तर ‘या’ सोप्या पद्धतीने बदलू शकता; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

by nagesh
Aadhaar Card Updates | you will not have to go to aadhar center for updates like aadhar card phone number and biometric at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आधार कार्ड (Aadhaar Card) एक महत्वाचे कागदपत्र आहे. मात्र, अनेकांच्या आधार कार्डवरील फोटो खराब असतो. तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरील फोटो पसंत नसेल तर तो बदलू शकता (How to Change Aadhaar card Photo). भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नाव, मोबाइल नंबर, जन्म तारीख, ई मेल अ‍ॅड्रेस आणि फोटोग्राफमध्ये बदल करण्यासाठी केवळ ऑफलाइन सुविधा देते. फोटोत बदल करण्यासाठी तुम्हाला जवळच्या एन्रॉलमेंट सेंटरमध्ये जावे लागेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन हे काम करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आधार कार्डचा (Aadhaar Card) फोटो बदलण्याची ही आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस

स्टेप

1. सर्वप्रथम यूआयडीएआयची वेबसाइट uidai.gov.in वर लॉग इन करा आणि आधार नावनोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.

2. हा आधार नावनोंदणी फॉर्म भरून जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जमा करा.

3. आता आधार नावनोंदणी केंद्रावर कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल घेईल.

4. आता आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.

5. आता आधार नामांकन केंद्राचा कर्मचारी शुल्क म्हणून 25 रुपये+जीएसटी घेऊन तुमच्या आधार कार्डवरील फोटो अपडेट करेल.

6. आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुम्हाला यूआरएनसह एक स्लिप सुद्धा देईल.

7. तुम्ही या यूआरएनचा उपयोग करून हे चेक करू शकता की तुमचा आधार कार्डचा फोटो अपडेट झाला आहे किंवा नाही.

8. आधार कार्ड फोटो अपडेट झाल्यानंतर, नवीन फोटोसह एक अपडेटेड आधार कार्ड युआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येऊ शकते.

 

Web Title : Aadhaar Card  how to update aadhaar card photo online follow these uidai instructions check how

 

हे देखील वाचा :

Jal Jeevan Mission | पीएम मोदी यांनी लाँच केले जलजीवन मिशन अ‍ॅप, पाणी समित्यांशी केली चर्चा

UGC NET Exam Date | यूजीसी नेट परीक्षा शेड्यूल बदलले, आता 6 ऑक्टोबरपासून होणार परीक्षा; ‘इथं’ चेक करा

Vishwas Nangare Patil | विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

 

Related Posts