IMPIMP

Monsoon | ‘मान्सून’ परतीच्या प्रवासाला उशिरा सुरूवात; 1960 नंतरची ‘ही’ दुसरी वेळ

by nagesh
Maharashtra Rains | heavy rains in upcoming 4-5 days in maharashtra imd alert

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Monsoon | भारतात यंदा अनेक ठिकाणी पाऊस (Rain in India) झाला आहे. मात्र यावर्षी जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पावसाळी ऋतूत (Monsoon) ‘सामान्य’ पाऊस झाल्याची नोंद केली गेली आहे. तर, ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यात दक्षिणेतील राज्यांत पावसाचं कारण ठरणारा ‘पूर्वेत्तर मॉन्सून’ ही यंदा सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणून तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा समुद्रकिनारी भाग, रायलसीमा, केरळ, दक्षिण कर्नाटक तसंच लक्षद्वीप या ठिकाणी सामान्य पाऊस पडू शकतो. याबाबत माहिती भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

उत्तर-पश्चिम भारताच्या (Rain in India) काही ठिकाणी 6 ऑक्टोबरच्या आसपास दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या (Monsoon) परतीच्या प्रवासाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
अशी माहिती विभागाचे महासंचालक एम महापात्र (Director General M Mohapatra) यांनी दिलीय.
तर, एवढ्या उशिरा मान्सूनच्या प्रवासाची सुरूवात होण्याची ही 1960 नंतरची दुसरी वेळ आहे.
2019 मध्ये उत्तर पश्चिम भारतात पावसाने 9 ऑक्टोबरपासूनच परतीच्या प्रवासाला सुरूवात केली होती.
उत्तर पश्चिम भारतापासून ते दक्षिण पश्चिम पाऊस जवळपास 17 सप्टेंबरपासून माघारी फिरतो.
असं IMD च्या वरिष्ठ अधिकारी आर के जेनामणि (R. K. Jenamani) यांनी सांगितलं आहे.

 

दरम्यान, सलग तिसऱ्या वर्षी भारतात सामान्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. 2019 आणि 2020 मध्ये ‘सामान्य’हून जादा पावसाची नोंद करण्यात आलीय.
तर, देशभरात जून 110 टक्के, जुलै 93 टक्के तर ऑगस्ट मध्ये 76 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यांत जास्त पाऊस पडतो.
तर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातल्या पावसाची कमतरता सप्टेंबर मध्ये भरून निघाली. सप्टेंबर महिन्यात 135 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकण – गोवा, मराठवाडा या ठिकाणी तर राजस्थान, हरयाणा, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर मध्य कर्नाटक, पश्चिम बंगालचं गंगा क्षेत्र,
अंदमान निकोबार या राज्यांत मान्सूनच्या काळात अधिक पावसाची नोंद (Rainfall record) करण्यात आली आहे.

 

Web Title : Monsoon | meteorological department says normal rainfall in the country from june to september

 

हे देखील वाचा :

जर पसंत नसेल Aadhaar Card वरील फोटो तर ‘या’ सोप्या पद्धतीने बदलू शकता; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Jal Jeevan Mission | पीएम मोदी यांनी लाँच केले जलजीवन मिशन अ‍ॅप, पाणी समित्यांशी केली चर्चा

UGC NET Exam Date | यूजीसी नेट परीक्षा शेड्यूल बदलले, आता 6 ऑक्टोबरपासून होणार परीक्षा; ‘इथं’ चेक करा

 

Related Posts