IMPIMP

Dipali Sayyed | दिपाली सय्यदने रचला होता राज ठाकरे यांच्या हत्येचा कट; सय्यद यांच्या माजी स्वीय सहाय्यकाच्या आरोपाने खळबळ…

by nagesh
Dipali Sayyed | deepali sayed was made plot to kill raj thackeray alleged by bhausaheb shinde at ahmednagar

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसांपूर्वी दिपाली सय्यदचे (Dipali Sayyed) माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेत दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच आरोप त्यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेत दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्यावर केले आहेत. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टमधून होणारे सर्व व्यवहार बेकायदेशीर असून त्यांच्याकडे येणारा पैसा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोप सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी दिपाली सय्यद यांच्यावर केला आहे.

 

त्यासोबतच दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अभिनेत्री दिपाली सय्यदने ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारही दिले होते. ५० लोकांना ५० हजारांचे चेक देण्यात आले होते. हे चेक बनावट असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी दिपाली सय्यद यांच्यावर केला आहे. तसेच दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सातशे ते आठशे कोटींचा व्यवहार झाला. हा सर्व पैसा कोठून आला याची देखील चौकशी करण्याची मागणी भाऊसाहेब शिंदे यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास आपण दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचे दाऊदशी असलेले संबंधाचे पुरावे आपण शासनाला आणि माध्यमांना देऊ, असे देखील शिंदे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हत्येचा कट दिपाली सय्यद यांचा होता असा गंभीर आरोप देखील त्यांनी दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्यावर केला आहे. अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद उचकावत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा आधार होता, असा आरोपही शिंदे यांनी केला.

 

मात्र शिंदे यांचे हे सर्व आरोप अभिनेत्री दिपाली सय्यदने (Dipali Sayyed) फेटाळून लावले आहेत.
त्या यावर बोलताना म्हणाल्या, मी कुणी मोठी नाही की घोटाळे करू शकेन. मला त्या व्यक्तीवर काही बोलायचं नाही.
पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा आरोप केला आहे, त्यावर काय बोलायचं,
असा सवाल दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यांनी नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला.

 

Web Title :- Dipali Sayyed | deepali sayed was made plot to kill raj thackeray alleged by bhausaheb shinde at ahmednagar

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘मी आता वहिनींनाच सांगणार आहे की…’ फडणवीसांकडे पाहून अजित पवारांची फटकेबाजी

Punit Balan Studios | फेब्रुवारीत मिळणार प्रेमाची भेट, ‘जग्गू आणि जुलिएट’! तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी; ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती

Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’

Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

 

Related Posts