IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar has criticized a statement of bjp state president chandrashekhar bawankule over baramati

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी बारामती येथे येऊन हा लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. या व्यक्तव्याचा अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज समाचार घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल
काही महिन्यापूर्वी बारामती येथे येऊन भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघात तगडी लढत देऊ असे बावनकुळे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये येऊन मला चॅलेंज देतात. घडाळ्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जर अजित पवार यांनी ठरवल ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, त्यामुळे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल असा इशाराच अजित पवारांनी बावनकुळे यांना दिला.

मनात ठरविले तर…
महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) विकास केला नाही, असं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण मनात ठरविले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. थोडा दमाने घ्या, असा टोला अजित पवार यांनी बावनकुळे यांना लगावला.

 

देवेंद्रजी घरी जाऊन वहिनीला सांगतो…
मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होऊन सहा महिने झाले आहेत.
परंतु मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री देण्यात आलेला नाही.
मी देवेंद्रजी घरी येऊन वहिनीला सांगतो, म्हणजे ते तुम्हाला सांगतील आणि तुम्ही मनावर घ्याल.
ज्यामुळे लवकरच महाराष्ट्रात महिला मंत्री होईल.
तुम्ही आजच रात्री दिल्लीला फोन लावा आणि उद्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar has criticized a statement of bjp state president chandrashekhar bawankule over baramati

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

Kajal Aggarwal | अभिनेत्री काजल अग्रवालच्या ‘त्या’ फोटोमुळे प्रेकक्षक संतापले ; “आमचं तू मन दुखावलं…”

Devendra Fadnavis | प्रलंबित राहिलेल्या ‘त्या’ 111 जणांना MPSC मार्फत नियुक्ती देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

Related Posts