IMPIMP

Dr. Amol Kolhe | ‘तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार’ ! खा. अमोल कोल्हेंनी पाळला ‘तो’ शब्द

by nagesh
Dr. Amol Kolhe | NCP MP Dr. amol kolhe words will come true in bull cart race in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Dr. Amol Kolhe | नुकतंच बैलगाडा शर्यतीवरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी ओपन आव्हान दिले होते. दरम्यान बैलगाडा शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असं आव्हान आढळराव पाटलांनी कोल्हे यांना दिलं होतं. ”त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,” असं अमोल कोल्हेनी म्हटलं होतं. हाच दिलेला शब्द त्यांनी आज पाळला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

खासदार अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे पुण्यातील (Pune News) निमगाव दावडी येथील घाटातील बारीत घोडीवर बसणार आहेत.
निमगाव दावडीचे बैलगाडा मालक आजच्या दिवशी या मानाच्या घाटात स्वखुशीने आपापल्या बैलांची जोडी उतरवत असतात.
त्याठिकाणीच आज कोल्हे घोडीवर बसणार आहेत. तसेच बैलजोडीसमोर बारी मारणार आहेत.
डिसेंबर 2021 च्या अखेरीस सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. या पार्श्‍वभुमीवर आढळराव पाटलांनी कोल्हेंना उपरोधिक आव्हान दिलं होतं.

 

 

 

 

 

दरम्यान, ‘अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं होतं.
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी अमोल कोल्हेंना निमंत्रण दिलं.
शेवटी कोल्हेंनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे.
दरम्यान, ”लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन”, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते.

 

Web Title :- Dr. Amol Kolhe | NCP MP Dr. amol kolhe words will come true in bull cart race in pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगार जेरबंद

Nandurbar Police | शेणखाताच्या गाडीतून देशी-विदेशी दारुची वाहतूक, नंदुरबार पोलिसांकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar Police | मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरले आश्रमशाळेतील लॅपटॉप; नंदुरबार पोलिसांकडून 48 तासात गुन्हा उघडकीस, 22 लॅपटॉप जप्त

 

Related Posts