IMPIMP

KB Hedgewar : एकेकाळी RSS च्या संस्थापकांनी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश, जाणून घ्या पुढं नेमकं काय झालं आणि काय घडलं

by bali123
dr k b hedgewar birthday rss founder was a part of congress why he chose to part away nagpur

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपचे जवळचे संबंध असल्याचे दिसत आहे. आरएसएसमधील स्वयंसेवक असलेले भाजपचे अनेक नेते सध्या केंद्रीय मंत्रिमंडळासह इतर महत्वाच्या पदावर आहेत. देशात सध्या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून राजकारणात दिसत आहेत. त्यामध्ये भाजप आणि काँग्रेस पक्ष आहेत. एकेकाळी आरएसएसचे स्वयंसेवक असलेली नेतेमंडळी काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहेत. पण आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार k b hedgewar यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

डॉ. केशव हेडगेवार यांना स्वातंत्र्यपूर्व काळात ‘वंदे मातरम्’ गीत गायल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आले होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचाही सहभाग होता. डॉ. हेगडेवार k b hedgewar हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. जेव्हा ते काँग्रेसचे पदाधिकारी होते तेव्हा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, काही काळानंतर 1925 मध्ये नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना केली.

बंदी असूनही गायले ‘वंदे मातरम्’ गीत
डॉ. हेडगेवार यांचा जन्म 1 एप्रिल, 1889 रोजी नागपूर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण नागपूरच्या नील सिटी हायस्कूलमध्ये झाले. शाळेत असताना तत्कालीन ब्रिटिश सरकारने एक परिपत्रक काढत शाळेत ‘वंदे मातरम्’ हे गीत गाण्यास बंदी घातली होती. मात्र, डॉ. हेगडेवार यांनी ‘वंदे मातरम्’ गीत म्हटले होते. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

काँग्रेसचे विदर्भ प्रांताचे सचिवही
डॉ. हेडगेवार k b hedgewar हे नामवंत अनुशीलन समिती क्रांतिकारी संस्थेशी जोडले गेले. 1915 मध्ये ते नागपुरात परतले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये काम सुरू केले. काही काळासाठी त्यांनी काँग्रेसचे विदर्भ प्रांताचे सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली. या कालावधीतच ते हिंदू महासभेतही सक्रिय होते.

सत्याग्रही म्हणून सहभागी, तुरुंगवासही भोगला
नागपुरात 1920 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव काँग्रेसमध्ये पहिल्यांदा मांडला होता. तो तेव्हा पारित झाला नाही. 1921 मध्ये काँग्रेसने पुकारलेल्या असहकार चळवळीतही ते सत्याग्रही म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

…म्हणून काँग्रेसपासून दूर
भारतात धार्मिक-राजकीय खिलाफत चळवळ सुरु झाली होती. त्यामुळे त्यांना काँग्रेससोबत काम करणे पटत नव्हते. त्यानंतर त्यांनी 1923 मध्ये झालेल्या सांप्रदायिक दंग्यांमध्ये त्यांची वाटचाल पूर्णत्वाने हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाली.

1925 मध्ये आरएसएसची स्थापना
डॉ. केशव हेडगेवार k b hedgewar यांना हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार करायची होती. त्यासाठी त्यांनी 1925 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. संघाचे ते पहिले सरसंघचालक होते. त्यांनी संघाला सुरुवातीपासूनच सक्रिय राजकारणापासून दूर ठेवले आणि सामाजिक व धार्मिक कार्यांमध्येच सहभाग राखला.

Also Read:
‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts