IMPIMP

Edible Oil in India | खाद्यतेलाच्या किंमती आणखी भडकण्याची शक्यता; एका अहवालातून माहिती समोर

by nagesh
Mustard Oil Price | mustard oil price today update in up uttar pradesh mustard oil fall know latest rate

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Edible Oil in India | एकीकडे पेट्रोल – डिझेल (Petrol – Diesel) वाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यातच दुसरीकडे खाद्य तेलाच्या किमती (Edible Oil in India) वाढणार असल्याचं एका आकडेवारीवरुन समोर आलं आहे. रशिया – युक्रेन युद्धाच्या (Russia – Ukraine War) पार्श्वभूमीवर देशात (India) फेब्रुवारी महिन्यात खाद्यतेलाचे दर वाढले. दरम्यान हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. रिटेल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बिझोमच्या (Retail Intelligence Platform Bizom) आकडेवारीनुसार, ब्रँडेड सूर्यफूल, वनस्पती, मोहरी आणि भुईमुगाच्या तेलाच्या किंमतीत दरमहा वाढ झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खाद्यतेलाच्या जागतिक मागणीचा महत्त्वपूर्ण भाग असलेले युक्रेन – रशिया (Russia – Ukraine) हे सूर्यफूल तेल या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहेत, भारतात तेलवर्गीय पिकांचा पेरा जसा कमी झाला. त्याचप्रमाणे मागील वीस वर्षापासून भारत हा खाद्यतेलाचा जागतिक पातळीवर एक मोठा आयातदार झाला. पॅकेज्ड सनफ्लॉवर तेलाच्या किंमती फेब्रुवारी महिन्यात मोहरीच्या तेलामध्ये 8.7 टक्के वाढ झाली. सोयाबीन तेलाचे दर (Soybean oil) 0.4 ट्क्के किरकोळ घसरले, तसेच वनस्पती तेलाच्या किंमती (Vegetable oil) 2.7 टक्के वाढले. भुईमुगाचे तेलाचे (Peanut oil) दर 1 टक्के वाढले होते. (Edible oil in India)

 

तर देशात प्रति वर्षी साधारण 2.5 आणि 3 दशलक्ष टन सुर्यफूल तेलाचा वापर केला जातो.
यामधील साधारण 70 टक्के युक्रेनमधून आयात करण्यात येते.
दरम्यान, 2021 साली युक्रेन आणि रशियाचा मिळून भारताच्या सर्व खाद्यतेलाच्या आयातीपैकी सुमारे 13 टक्के वाटा होता, जो 1.6 दशलक्ष टन पुरवठा करतो.
असं रॉयटर्सच्या एका अहवालानुसार समोर आलाय.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन तिमाहींमध्ये खाद्यतेलाच्या किंमतीत काही प्रमाणात स्थैर्य आले असले, तरी रशिया – युक्रेन युद्धामुळे हा ट्रेंड बदलला आहे.
युक्रेनमधून प्रमुख आयात होणाऱ्या सूर्यफूल तेलाचे भाव लगेच वाढल्याचे दिसून आले आहे.
युद्धाचा प्रभाव वाढत असल्याने आणि रशियावर निर्बंध लादले जात असल्याने किंमती अधिक भडकण्याची शक्यता आहे.”
असं बिझोमचे मुख्य विपणन अधिकारी अक्षय डिसोझा (Akshay D’Souza) यांनी सांगितले.

 

बीएनपी परिबास इंडियाचे इंडिया इक्विटी रिसर्चचे प्रमुख कुणाल व्होरा (Kunal Vora) यांनी सांगितले की,
”कोविडपूर्व 2020 पेक्षा खाद्यतेलाच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत.
त्यात सूर्यफूल तेलाच्या किंमती 50 टक्क्यांनी, तर वनस्पती तेलाच्या किंमती 58 टक्क्यांनी आणि सोयाबीन तेलाच्या किंमती जवळपास 20 टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या दरम्यान, भारतामध्ये पॅकेज्ड सनफ्लॉवर तेलाच्या किंमती फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे 4 टक्के वाढल्या, तर मोहरीच्या तेलाने 8.7 टक्के वाढ केली.
सोयाबीन तेलाचे दर 0.4 टक्के किरकोळ घसरले, तर वनस्पती 2.7 टक्के वाढले. भुईमुगाच्या तेलात 1 टक्के वाढ झाली होती.
पाम तेल, जे भारतीय घरांत वापरले जाते, ज्याची किंमत उच्चांकी पातळीवर पोहचली होती, त्याच्या किंमती अनेक दिवसानंतर 12.9 टक्के कमी झाल्या आहेत.
फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत पाम तेलाच्या किंमती अद्याप 22.9 टक्केवर आहेत.

 

Web Title :- Edible Oil in India | cooking oil prices hike on russia ukraine conflict

 

हे देखील वाचा :

Diabetes Causing Foods | केवळ साखर नव्हे, ‘या’ 5 हेल्दी गोष्टी सुद्धा आहेत डायबिटीजचे कारण, वेगाने वाढू शकते Blood Sugar

Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांचा घणाघात; म्हणाले – ‘शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा’

Aaditya Thackeray | शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखावरुन आदित्य ठाकरे म्हणाले…

 

Related Posts