IMPIMP

Eknath Shinde Group | उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचा आणखी एक धक्का ! नवी मुंबई, ठाण्यातील नगरसेवकानंतर KDMC पालिकेतील नगरसेवक शिंदे गटात सामिल

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनएकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर सातत्याने शिवसेनेला धक्के बसत आहेत. 40 आमदार शिंदे गटात (Eknath Shinde Group) गेल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पायउतार व्हावे लागले होते, तसेच राज्यातील सत्ता गेली. महत्वाचे दोन-तीन नेते सुद्धा डोके वर काढत आहेत. त्यातच बंडखोरांनी (Eknath Shinde Group) ठिकठिकाणी शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडण्याचे सत्र अवलंबले आहे. ठाणे शहर (Thane City), कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला, येथे शिवसेनेचे जास्त नुकसान होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता, तो आता खरा ठरत आहे. ठाणे, नवी मुंबईनंतर (Navi Mumbai) आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) सुद्धा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काल ठाण्यातील 67 पैकी 66 माजी नगरसेवकांनी (Corporator) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला. नवी मुंबईतील 28 माजी नगरसेवक सुद्धा शिंदे गटात (Eknath Shinde Group) गेले. यानंतर आता कल्याण डोबिंवलीमधील 50 माजी नगरसेवकदेखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

कल्याण डोंबिवलीतील सुमारे 55 नगरसेवकांनी शिंदे यांना पाठींबा दर्शवला आहे. गुरुवारी रात्री नगरसेवक, सेनेतील पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) यांनी दिली.

 

यामुळे शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत देखील खिंडार पडले आहे. काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, सर्व नगरसेवकांनी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत असल्याचे सांगितले आहे.

 

मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी कल्याण-डोंबिवलीच्या सर्व नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सेना भाजपा युतीचे (shivsena- BJP Alliance) वर्चस्व राहिले आहे. कल्याण हा सेनेचा तर डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील महापालिका निवडणुकीत (Municipal Election) सेना भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली.
यावेळी सेनेचे 52 तर भाजपाचे 42 नगरसेवक निवडून आले होते.
आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यास सुरवात केली होती.
यातूनच भाजपाचे 7 नगरसेवक काही महिन्यांपूर्वीच सेनेत प्रवेश केला आहे. तर सेनेच्या 3 नगरसेवकांचे निधन झाले आहे.

 

बंडानंतर आता शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांसमोर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिंवली येथे पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे.
ठाण्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नंतर शिवसेनेचा नवा चेहरा कोण हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Web Title :- Eknath Shinde Group | 40 ex corporator of shivsena kdmc join eknath shinde group

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मनातलं दुःख; म्हणाले – ‘माशाचे अश्रू दिसत नाहीत’

Universal Pension Income | निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार; केंद्र सरकार लवकर एक चांगला निर्णय घेणार

Nilesh Rane | शिंदेंना ट्विट करता येतं का ? म्हणणार्‍या राऊतांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले – ‘स्वत: दहावी दोनदा नापास…’

 

Related Posts