IMPIMP

Eknath Shinde Group | उध्दव ठाकरेंच्या आरोपांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण नको, कधीही…’

by nagesh
Dasara Melava 2022 | ncps banner for shivsenas uddhav thackeray Dasra Melava 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनधनुष्यबाण शिवसेनेचा (Shivsena) आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले होते. यानंतर एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक निवडणूक ही जनतेच्या कोर्टात जाऊनच आम्ही लढत असतो. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचवण्यासाठी घेतला. त्यांनी कधीही शिवसेनेवर टीका केली नाही, कधीही धनुष्यबाण (Dhanushya Ban) स्वत:ला मिळावा म्हणून प्रयत्न केले नाहीत. कुठेही निशानी (Shivsena Symbol) घेण्याचा संबंध जोडण्यात येऊ नये, संभ्रम राहू नये, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाने (Eknath Shinde Group) दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उद्धव ठाकरेंनी कोणतेही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर (Thackeray Family) ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही. काल परवाच्या बैठकीत आम्ही त्यावर बोललो आहोत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील बाळासाहेबांच्या कुटुंबावर टीका होऊ नये, एवढा त्यांचा आदर राखला जावा, असे आम्हाला सांगितले होते. आम्ही त्यांना तुमचा एखादा नेता असे बोलतोय हे निश्चित सांगू, असे शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.

 

उदय सामंत पुढे म्हणाले, मातोश्रीचे दरवाजे उघडल्यावर त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सामान्य शिवसैनिकांना भेटत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तसेच मंत्री पदावरुन मी माझ्या वैयक्तिक कामात होतो, मुंबई (Mumbai), सुरत (Surat), गुवाहाटी (Guwahati), गोवा (Goa) आणि परत मुंबई असा फेरा झाला. माझ्यावर महाराष्ट्राच्या सेवेची एखादी जबाबदारी टाकली तर मी ती निश्चितपणे पार पाडेन असे सामंत यांनी सांगितले.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना पक्ष केंद्रस्थानी आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं.
भाजपच्या (BJP) पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री (CM) झाले. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख (Party Chief) उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली.
यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट करताना बंडखोरांवरही खोचक शब्दांत निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांचे (Rebel MLA) आभार व्यक्त केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत.
त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे. ठाकरे कुटुंबीय बद्दल आदर वाटत आहे.
त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले.
पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता.
तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का ? असा सणसणीत टोला त्यांनी बंडखोरांना लगावला.

आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलू लागलेत.
ज्यांनी आजवर ठाकरे कुटुंबीयांबाबत विकृत भाषेत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात.
मग तुमचं प्रेम खरं की खोटं ? माझ्याबद्दल आजवर ते लोक जे बोलले ते तुम्हाला लखलाभ, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Eknath Shinde Group | eknath shinde doesnt want a bow and arow sign of shivsena never tries shinde groups uday samant reaction to uddhav thackerays allegations

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde Group | उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचा आणखी एक धक्का ! नवी मुंबई, ठाण्यातील नगरसेवकानंतर KDMC पालिकेतील नगरसेवक शिंदे गटात सामिल

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मनातलं दुःख; म्हणाले – ‘माशाचे अश्रू दिसत नाहीत’

Universal Pension Income | निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार; केंद्र सरकार लवकर एक चांगला निर्णय घेणार

 

Related Posts