IMPIMP

Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | ‘धनुष्यबाण’ कोणाचे? अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिले महत्वाचे संकेत, निकाल देताना आमदार, खासदारांची संख्या, प्रतिज्ञापत्रांचाही विचार होणार का?

by nagesh
Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | shinde vs thackeray fight over shivsena political symbol bow and arrow election commission will consider affidavits  number of mla mp adv ujjwal nikam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | शिवसेना आणि शिंदे गटातील धनुष्यबाणाच्या वादाबाबत निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. लवकरच धनुष्यबाण (Shivsena Political Symbol) पक्षचिन्ह कुणाचे यावर निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र हा निकाल लावताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरुन घेतलेली प्रतिज्ञापत्र कामी येणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Adv Ujjwal Nikam) यांनी माहिती दिली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, शिंदे गटाने आणखी एक याचिका दाखल केली असून यात म्हटले आहे की, शिवसेनेकडे पुरेसे पाठबळ नसताना त्यांच्याकडून धनुष्यबाण या चिन्हाचा अंधेरी पोटनिवडणुकीत चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो. यासाठी तातडीने सुनावणी घ्यावी.

 

या सर्व प्रकरणावर अ‍ॅड उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की, दोन्ही गटांकडून पुरावे सादर करुन झाले असल्याची खात्री झाल्यावरच निवडणूक आयोग निकाल देईल. पुरावे सादर करणे अद्याप बाकी असल्यास निर्णय प्रलंबित राहील. याच कालावधीमध्ये पोटनिवडणूक आली तर मात्र निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्ह गोठवावे लागेल. (Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray)

 

निकम म्हणाले, सामान्यपणे दोन गोष्टींचा विचार निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) यासंदर्भात केला जाईल.
यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेकडे एक राजकीय पक्ष म्हणून पाहणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्याकडे संघटना म्हणून पाहणे.

 

या प्रतिज्ञापत्रांचा संदर्भ निकाल देताना ग्राह्य धरला जाईल असे संकेत देताना अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की,
निवडणूक आयोग साधारणपणे दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करते.
एक म्हणजे इलेक्टीव्ह विंग, ज्याला लेजिसलेटीव्ह म्हणतात.
म्हणजेच राजकीय पक्ष स्वरुपात आणि दुसरी ऑर्गनायझेशनल विंग म्हणजेच संघटनात्मक स्वरुप.
आता इलेक्टीव्ह विंगसंदर्भात विचार करताना आमदार, खासदार कोणाच्या बाजूने आहेत हे महत्त्वाचे ठरते.
तर ऑर्गनायझेशनल विंगमध्ये संघटनेचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत,
यासंदर्भातील पुरावा प्रतिज्ञापत्रावर दिला जातो.
अर्थात यासंदर्भात कोणाचे बळ किती आहे हे तपासून निवडणूक आयोग यासंदर्भातील निर्णय घेईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | shinde vs thackeray fight over shivsena political symbol bow and arrow election commission will consider affidavits  number of mla mp adv ujjwal nikam

 

हे देखील वाचा :

Arun Bali Passed Away | दुःखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे 79 व्या वर्षी निधन

Pune Crime | दीड कोटीच्या फसवणुक प्रकरणात अ‍ॅड. सतीश मुळीक, अग्रजीत मुळीक, जितेंद्र भोसले, राम भुजबळ यांच्यावर FIR

HDFC Bank | एचडीएफसी बँकेने व्यापाऱ्यांसाठी लाँच केले स्मार्टहब व्यापार; सर्व बँकिंग आणि व्यवसाय समाधानांसाठी वन-स्टॉप व्यापारी समाधान अ‍ॅप

 

Related Posts