IMPIMP

EPFO Update | जर केले नाही ईपीएफ खात्याशी संबंधीत ‘हे’ काम तर तुम्ही पाहू शकणार नाही अकाऊंट पासबुकच्या डिटेल

by nagesh
EPFO Update | epfo update if you do not joint e nomination in epf account then you will not be able to see the details of account passbook

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEPFO Update | जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत खाते उघडले असेल आणि अद्याप नॉमिनीचे नाव (ई-नॉमिनेशन) जोडले नसेल, तर तुम्ही तुमच्या EPF खात्याचे पासबुक पाहू शकणार नाही. कारण EPFO ने आता EPF पासबुक पाहण्यासाठी ई-नॉमिनेशन (e-nomination in epfo) अनिवार्य केले आहे. जर ई-नामांकन केले नाही, तर तुम्ही पासबुकशी संबंधित कोणतेही काम करू शकणार नाही. यापूर्वी पीएफ खातेधारक त्यांच्या पासबुकचे तपशील तपासू शकत होते. (EPFO Update)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

29 डिसेंबर 2021 रोजी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेदारांसाठी ई-नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख वाढवली होती. आता ईपीएफ खातेदार यानंतरही हे काम करू शकतात. त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

 

अनेक खातेदारांना त्यांचे ई-पासबुक वापरताना मोठी समस्या भेडसावत आहे. कारण त्यांनी त्यांची ई-नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन केल्यानंतर, ग्राहकांना पासबुक पाहण्यासाठी त्यांची ई-नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगणारा पॉप-अप संदेश प्राप्त होत आहे.

 

कसे करावे ई-नामांकन
ईपीएफओ खातेधारक आता घरी बसूनही ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. त्यासाठी संस्थेने आपल्या पोर्टलवर ही सुविधा दिली आहे. मात्र, यासाठी यूएएन असावे आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असावा. (EPFO Update)

 

 

प्रथम EPFO ची वेबसाइट www.epfindia.gov.in वर व्हिजीट करा.

तुमचा UAN No. आणि पासवर्ड नोंदवून लॉगइन करा.

नंतर मॅनेज टॅबवर क्लिक करून ई-नॉमिनेशन ऑपशन निवडा.

आता नवीन पेज ओपन होईल, तिथे मेंबरची पूर्ण माहिती जसे की, नाव, UAN, जन्म तारीख दिसेल.

नंतर मुळ आणि सध्याचा पत्ता नोंदवून सेव्ह ऑपशनवर क्लिक करा.

आता कौटुंबिक घोषणा अपडेट करण्यासाठी YES च्या पर्यायावर क्लिक करून अ‍ॅड फॅमिली ऑपशनवर जा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तिथे नॉमिनीचे नाव, नाते, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर नोंदवा.

नंतर नॉमिनेशन डिटेल्सवर जाऊन हे ठरवू शकता की कोणत्या नॉमिनीला EPF चा किती भाग दिला जावा.

नंतर सेव्ह नॉमिनेशन ऑपशनवर क्लिक करा.

यानंतर OTP जनरेट करावा लागेल, ज्यासाठी ई-साइन टॅबवर क्लिक करा.

यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

आलेला ओटीपी भरताच ई-नॉमिनेशन EPFO सोबत रजिस्टर होईल.

 

Web Title :-  EPFO Update | epfo update if you do not joint e nomination in epf account then you will
not be able to see the details of account passbook

 

हे देखील वाचा :

Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बरोबरीने सेवालाभांचा दावा करू शकत नाहीत ‘हे’ कर्मचारी – कोर्ट

Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

 

Related Posts