IMPIMP

Gold-Silver Price | दिवाळी संपताच 0.3% ‘स्वस्त’ झाले सोने, चांदी घसरून 63,741 रुपयावर आली

by nagesh
Gold Price Today | gold gains rs 47 silver jumps rs 496 check latest

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Gold-Silver Price | मोठ्या उसळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत शुक्रवारी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याचा दर 0.03 टक्के कमी होऊन 47,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर कमी होऊन 63,741 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी गुरुवारी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगच्या दरम्यान सोन्याच्या किमतीत 600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीच्या किमतीत 1,800 रुपये प्रति किलोची उसळी आली होती. (Gold-Silver Price)

 

जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये सोन्याची किंमत आज 1,792.74 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली.
तर चांदीचा हाजीर भाव (Spot Silver Price) 0.1 टक्के घसरून 23.75 डॉलर प्रति औंसवर आला.
तर प्लॅटिनमचा भाव 0.2 टक्के वाढून 1,027.84 डॉलर प्रति औंस झाला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आगामी दिवसात वाढणार का सोन्याचा दर?

 

कॅनडाच्या गोल्ड मायनिंग इंडस्ट्रीसंबंधी दोन मोठ्या दिग्गजांचे म्हणणे आहे की, आगामी दिवसात सोन्याच्या किमतीत तेजी दिसू शकते.
कॅनडा गोल्ड कॉर्प इंकसोबत अगोदर काम केलेले डेव्हिड गारोफॉलो आणि रोब मॅक्विन (David Garofalo & Rob McEwen)
यांचे म्हणणे आहे की लवकरच महागाईमुळे दर वाढताना दिसू शकतात.
त्यांनी म्हटले की, सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहचू शकते.
जी सध्या 1,800 डॉलरच्या जवळपास आहे. तर McEwen चे मत आहे की, लाँग टर्ममध्ये सोने 5000 डॉलरचा स्तर सुद्धा गाठू शकते.

 

दरम्यान, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, ते अजूनही या मतावर कायम आहेत की, मागील काही दिवसांपासून दिसणारी महागाई ‘अस्थायी‘ आहे.
शुक्रवारी आणखी एका प्रमुख सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंडने आपला व्याजदर 0.1 टक्केच्या विक्रमी खालच्या स्तरावर कायम ठेवण्याची घोषणा केली.
मात्र, यासोबत संकेत सुद्धा दिला आहे की, आगामी काळात महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी दर वाढवले जाऊ शकतात. (Gold-Silver Price)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Gold-Silver Price | gold and silver price rate today declined on mcx after sharp jump in previous session

 

हे देखील वाचा :

CBSE | सीबीएसईने 10 वी – 12 वी च्या परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय ! जारी केली नवीन मार्गदर्शकतत्त्वे

Dhananjay Munde | पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणाले…

Eknath Shinde | पोलिसांचा सण झाला गोड ! पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना भरवला ‘फराळ’

 

Related Posts