IMPIMP

Rahul Bajaj Passes Away | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे 83 व्या वर्षी निधन

by nagesh
Rahul Bajaj Passes Away | One of India’s foremost Business leaders, Rahul Bajaj, Former Chairman of Bajaj Auto passes away at 83

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rahul Bajaj Passes Away | प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी पुण्यात (Pune) निधन (Rahul Bajaj Passes Away) झाले. ते 83 वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. राहुल बजाज यांनी 1972 मध्ये बजाज समूहाची (Bajaj Group) जबाबदारी स्वीकारली. ते जवळपास 5 दशके बजाज ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित होते.

देशातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक असलेल्या राहुल बजाजने दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या क्षेत्रात बजाज ऑटोची निर्मिती केली आणि तिला आघाडीच्या स्थानावर नेले. 2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारही मिळाला आहे.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता (Kolkata) येथे झाला.
दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले.
याशिवाय बजाज यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली होती.

Web Title :- Rahul Bajaj Passes Away | One of India’s foremost Business leaders, Rahul Bajaj, Former Chairman of Bajaj Auto passes away at 83

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुण्यात सलग 4 दिवसात कमी दाबाने पाणीपुरवठा, जाणून घ्या सविस्तर

Multibagger Sugar Stocks | ‘हे’ 5 शुगर स्टॉक करत आहेत मालामाल,1 वर्षात 400% पर्यंत दिला रिटर्न

Kolhapur Crime | दुर्दैवी ! लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच 28 वर्षीय युवकाचा हृदयद्रावक मृत्यू

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसची ग्रामीणवासीयांसाठी जबरदस्त स्कीम ! केवळ 95 रुपये गुंतवा अन् मिळवा 14 लाख, जाणून घ्या

Related Posts