IMPIMP

GST | नॉन – ब्रँडेड खाद्यान्न वस्तूंवर लगू होणार्‍या GST संदर्भात शुक्रवारी राज्यव्यापी व्यापारी परिषद

by nagesh
GST | taxpayers with turnover more than 2 crore file gstr 9 gstr 9c before 31 december

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन GST | अन्नधान्य व खाद्यान्न वस्तुंवर केंद्र शासनाकडून ५ % जी.एस.टी. लागू केल्यास त्याचा परिणाम व्यापारी आणि थेट ग्राहकांवर होणार आहे. जी.एस.टी.तील या जाचक तरतुदीला व्यापार्‍यांचा विरोध असून पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवार दि. ८ जुलै रोजी मार्केटयार्ड येथील व्यापार भवन येथे राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया (Rajendra Bathia, President of The Poona Merchant Chamber) यांनी दिली. (GST)

 

या परिषदेला राज्यातून १२५ सुमारे १२५ असोसिएशनचे १७५ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रथमच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रीकल्चर, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र दि ग्रेन राईस ऍन्ड ऑईलसीडस् मर्चंटस् असोसिएशन, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ऍन्ड ट्रेड , कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (महाराष्ट्र ), ग्राहक पंचायत, दि पूना मर्चंटस् चेंबर व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स (महाराष्ट्र ) अशा सुमारे १० संस्थांचे प्रतिनिधी एका व्यासपिठावर उपस्थित राहणार आहेत. (GST)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सदर परिषदेस संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मुख्य संघटनांचे प्रतिनिधी अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, जळगांव, जालना, कोल्हापूर, मुंबई नाशिक, रायगड, सातारा, सांगली व सोलापूर इ. विविध जिल्यातून उपस्थित राहणार आहेत. तसेच परिषदेस जीएसटी तज्ञ व्यःती मार्गदर्शन करणार असल्याची माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

 

Web Title :- GST | Statewide Trade Council on Friday regarding GST applicable to non-branded food items

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | ‘गद्दार हे गद्दार असतात, ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दार उघडे’ – आदित्य ठाकरे

Raj Babbar | कोर्टाचा मोठा निर्णय ! अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा

Cabinet Expansion | ‘शिंदे सरकार’चा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी आधीच, 8-10 मंत्री शपथ घेणार !; ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदे

 

Related Posts