IMPIMP

Aditya Thackeray | ‘गद्दार हे गद्दार असतात, ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दार उघडे’ – आदित्य ठाकरे

by nagesh
Aaditya Thackeray | vedanta foxconn project aaditya thackeray on devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनगद्दार हे गद्दार असतात पण ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) दारं उघडे आहेत, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे. शिवसेना भवनात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंड केलेल्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

 

ज्या आमदारांना परत शिवसेनेत यायचं आहे त्यांच्यासाठी सेनेचे दारं उघडे आहेत, गद्दार हे गद्दार असतात असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह (Party Symbol) मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून (Eknath Shinde Group) प्रयत्न केले जात आहेत.
पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, मुलगी पळून जाऊन लग्न केल्यानंतर त्यांना परत आणताना त्यांच्या कुटुंबप्रमुखाची ही परवानगी घ्यावी लागते.
त्यांच्याशी चर्चा करावी लागते, आता भाजप (BJP) आणि शिंदे गटाची युती झालेली आहे.
सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपशीही चर्चा करावी लागेल.
फक्त आमच्याशी चर्चा करुन चालणार नाही असं थेट केसरकरांनी ठाकरेंना बजावलं आहे.

 

आदित्य ठाकरे यांची ‘निष्ठा यात्रा’

शिवसेनेतील पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे उद्यापासून ‘निष्ठा यात्रे’वर निघत आहेत.
आदित्य ठाकरे हे मुंबईतला प्रत्येक मतदार संघ प्रत्येक शाखा पिंजून काढणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेची सुरुवात ही बंडखोर आमदार यामिनी जाधव (Rebel MLA Yamini Jadhav) यांच्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबईतील भायखळ्यातून होत आहे.
आदित्य ठाकरे मुंबईतील ठाकरे गटाकडे उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचीही ‘निष्ठा यात्रा’ फक्त मुंबई पुरती थांबणार नाही,
तर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचाही प्लॅन आखला आहे.

 

Web Title :- Aditya Thackeray | shivsena aditya thackeray on cm eknath shinde group mla

 

हे देखील वाचा :

Raj Babbar | कोर्टाचा मोठा निर्णय ! अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा

Cabinet Expansion | ‘शिंदे सरकार’चा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी आधीच, 8-10 मंत्री शपथ घेणार !; ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदे

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

 

Related Posts