IMPIMP

Gulabrao Patil | ‘मी पण महाविकास आघाडी फुटण्याची वाटच बघतोय’ – गुलाबराव पाटील

by nagesh
Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात शिंदे गट,
भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीने मात्र या
प्रकरणात हात वर केले आहेत. आम्ही राहुल गांधींच्या मतांशी सहमत नाही, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. तसेच राहुल
गांधी यांना हा विषय आता काढण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तुटण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी तर महाविकास आघाडी तुटण्याचीच वाटच बघत बसलो आहे, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

धरणगाव शहरातील बसस्थानकात रात्री उशिरापर्यंत बस आल्या नसल्याने विद्यार्थीनी अडकून पडल्या होत्या. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. गुलाबराव पाटलांनी या प्रकाराला उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले आहे. शेगावला कार्यक्रम असल्यामुळे सर्व बसेस व्यग्र आहेत. मुंबईला आमचा आणि उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम होता, त्यावेळी देखील अशीच परिस्थिती झाली होती. तेव्हा आंदोलन झाले नाही. आता काँग्रेस त्यांचा लाडका पक्ष झाला आहे. त्यांचे राजे येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व बस सोडल्या आहेत, असे यावेळी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले. तसेच महाविकास आघाडीत फूट पडणार असेल, तर चांगलेच आहे. मी त्याची वाट बघत आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

 

शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीवर भाष्य करताना म्हंटले होते,
वीर सावरकरांचा मुद्दा महत्वाचा आहे. वीर सावरकरांबद्दल आम्हाला आदर आहे.
त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केले आहे.
राहुल गांधी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. वीर सावरकांची कोणत्याही प्रकारची बदनामी आणि
वक्तव्य आम्ही सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे.
त्यावर आमचा विषय संपतो, असे यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे देखील संजय राऊत म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil reaction on sanjay raut statement over mva rahul gandhi on savarkar

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | ‘खरा इतिहास एकदा सर्वांच्या समोर येऊ द्या’ – आ. रोहित पवार

Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले

PM Narendra Modi | नरेंद्र मोदींची पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीका; “दहशदवाद हे काही देशांचे परराष्ट्र धोरण” आंतरराष्ट्रीय परिषदेला करत होते संबोधित

 

Related Posts