IMPIMP

Health Benefits of Pulses | बनवण्यापूर्वी 6 तासांसाठी आवश्य भिजवा डाळ, दूर होतील पचनाशी संबंधीत या समस्या

by nagesh
Health Benefits of Pulses | pulses benefits for health right way to cook pulse for best nutrition

सरकारसत्ता ऑनलाइन – Health Benefits of Pulses | डाळ हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. आपल्या देशात, बहुतेक घरांमध्ये दिवसभरात किमान एक वेळ तरी डाळ खाल्ली जाते. डाळ हा प्रोटीनचा (Protein) नैसर्गिक स्रोत आहे. कडधान्यांपासून मिळणारे पोषण शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आवश्यक असते. दाट केस आणि सुंदर त्वचेसाठीही रोज किमान एक वाटी डाळ खाणे आवश्यक आहे. पण डाळ खाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा ती योग्य पद्धतीने बनवली जाते. ही बाब तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे, त्यामुळे आवश्य जाणून घ्या. (Health Benefits of Pulses)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डाळ बनवण्याची योग्य पद्धत
डाळ कोणतीही असो, प्रेशर कुकरमध्ये एका शिट्टीने तयार केलेली असो किंवा 5 शिट्ट्यांमध्ये तयार केलेली असो, प्रत्येक डाळ तयार करण्यापूर्वी ती किमान 6 तास भिजवली पाहिजे. असे केल्याने डाळींचे गुणधर्म वाढतात आणि शरीराला ती पचवणे सोपे जाते.

 

कारण अनेक आरोग्यविषयक गुणधर्मांचा खजिना असूनही डाळींमध्ये अशी काही संयुगे असतात, जी शरीराला हानी पोहोचवतात. त्यांना पाण्यात भिजवल्याने त्यांचा वाईट परिणाम दूर होतो. (Health Benefits of Pulses)

 

ही डाळ तर सर्वजण भिजवतात
साधारणपणे, छोले, हरभरा, चवळी, राजमा आणि उडीद यांसारख्या डाळी एक रात्र आधी किंवा 8 ते 10 तास आधी भिजवल्या जातात. तर तूरडाळ, मूग डाळ, चणा डाळ, उडदाची डाळ तयार करताना धुऊन लगेच बनवली जाते. असे केल्याने तुमच्या पचनाला हानी पोहोचू शकते.

 

डाळी बनवण्यापूर्वी किमान 6 तास पाण्यात भिजत ठेवा. तसेच राजमा, हरभरा आणि चणे 10 ते 12 तास पाण्यात भिजवून ठेवणे चांगले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डाळ भिजवण्याचे फायदे
डाळ पाण्यात भिजवून नंतर तयार ठेवल्याने डाळीमध्ये असलेले अमायलेस नावाचे संयुग सक्रिय होते.
हे कंपाऊंड डाळीमध्ये आढळणारे जटिल स्टार्च तोडते आणि पचनाची प्रक्रिया सुलभ करते.

 

भिजवल्यानंतर डाळ बनवल्याने शरीरातील खनिजांचे शोषण वाढण्यास मदत होते.
कारण डाळ भिजवल्याने फायटेस नावाचे एन्झाइम सक्रिय होते आणि हे एन्झाइम शरीरातील आयर्न, कॅल्शियम आणि झिंकची स्थिती सुधारण्यास मदत करते.

 

काही लोकांना कडधान्य खाल्ल्यानंतर गॅस तयार होण्याची समस्या होते. ही समस्या टाळण्यासाठी सुद्धा डाळ भिजवणे आवश्यक आहे.
कारण डाळी शेंगांपासून बनवल्या जातात आणि बहुतेक शेंगांमध्ये ऑलिगोसॅकराइड आढळतात.

 

ऑलिगोसॅकराइड्स ही एक विशेष प्रकारची साखर आहे, जी शरीरात गॅस तयार करते आणि सूज वाढण्याचे कारण ठरते.
भिजवल्यानंतर डाळ बनवल्याने या साखरेचा प्रभाव बराच कमी होतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Benefits of Pulses | pulses benefits for health right way to cook pulse for best nutrition

 

हे देखील वाचा :

Central Consumer Protection Authority (CCPA) | दिशाभूल करणार्‍या जाहिरांतींना लागणार लगाम ! सरकारने Naapatol आणि Sensodyne विरुद्ध जारी केला आदेश

Hinganghat Burning Case | हिंगणघाट जळीत प्रकरणात दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

Airtel पुन्हा देणार महागाईचा झटका! यावर्षी पुन्हा महाग होऊ शकतात Prepaid Plans

 

Related Posts