IMPIMP

Heart Disease | उच्च रक्तदाबाव्यतिरिक्त ‘या’ कारणामुळं देखील वाढताहेत हृदयरोगाचे रुग्ण, सुमारे 60 टक्के रूग्णांना होतेय ‘ही’ परेशानी

by nagesh
Heart Disease | latest study says insomnia causes heart disease know how to how to prevent heart problems

सरकारसत्ता ऑनलाइन – हृदयरोग (Heart Disease) हा एक गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि मधुमेह (Diabetes) यामुळे पुढे वाढणारा हा आजार आहे. आरोग्य तज्ज्ञ उच्च रक्तदाबाच्या समस्येला हृदयरोगाचे (Heart Disease) प्रमुख कारण मानत आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना, उच्च रक्तदाबाव्यतिरिक्त आणखी एक सामान्य समस्या हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये (Heart Disease Patients) आढळून आली आहे. नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील संशोधकांनी या अभ्यासात नमूद केले आहे की, हृदयरोग होण्याचे कारण निद्रानाश (Insomnia) हे एक आहे. अर्ध्याहून अधिक हृदयरुग्णांना निद्रानाश दिसून आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हृदयरोगाने (Heart Disease) ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांना झोपेशी संबंधित विकार (Sleep Disorders) असतात. संशोधकांचे म्हणणे आहे की आतापर्यंत झोपेच्या समस्येचा मानसिक आरोग्याशी संबंध असल्याचे पाहिले गेले आहे. परंतु आमच्या अभ्यासात असे आढळले आहे की चिंता आणि नैराश्याच्या (Anxiety And Depression) लक्षणांवर उपचार करूनही रुग्णांमध्ये निद्रानाश समस्या कायम राहू शकतात, असे निरीक्षण स्लीप अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया.

 

निद्रानाशामुळे प्रमाणात वाढ (Rising Heart Disease Cases Due To Insomnia) – प्रमुख संशोधक, लेखक लार्स फ्रॉस्ड म्हणतात, आमच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, वेळेवर मूल्यांकन करून हृदयरोगींमध्ये निद्रानाशाच्या समस्येचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. निद्रानाश हृदयरोग आणि आरोग्याच्या इतर समस्यांच्या गुंतागुंत होण्याचा धोका वाढवू शकतो. डॉक्टरांनी आणि रुग्णांनी याची विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला निद्रानाशाचा अनुभव येत असेल, तर वेळीच त्याचे निदान करून त्यावर उपचार करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अभ्यासातून काय समोर आलं (What Did Study Find) ?

या अभ्यासासाठी, संशोधकांनी हृदयविकाराचा झटका किंवा स्टेंट रोपण किंवा बायपास शस्त्रक्रिया (Heart Attack Or Bypass Surgery) असलेल्या १,०६८ रूग्णांचा समावेश केला. पाचपैकी एक महिला होती. बेसलाइनवरील रुग्णांचे सरासरी वय ६२ वर्षे होते आणि सुमारे निम्म्या सहभागींनी (४५ टक्के) निद्रानाशाची तक्रार केली होती. अभ्यासाच्या विविध टप्प्यांचा आढावा घेतल्यानंतर, संशोधकांना असे आढळले की निद्रानाश हा हृदयरोग वाढविणारा घटक असू शकतो, ज्याकडे सामान्यत: दुर्लक्ष केले जाते.

 

आरोग्यावर विपरित परिणाम (Adverse Effects On Health) – ज्या प्रकारचे परिणाम दिसून आले आहेत, असे म्हटले जाऊ शकते की जर सहभागींना निद्रानाशाची समस्या उद्भवली नसेल तर १६% लोकांना मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ शकते. ज्या लोकांना हृदयरोगाचा त्रास आहे, किंवा ज्यांना नाही, अशा लोकांसाठी, सर्व लोकांनी पुरेशी झोप घेण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

 

पूर्ण झोप आवश्यक (Full Sleep Required) – लीड रिसर्चर लार्स फ्रॉस्ड यांनी
अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे की, हृदयरोग्यांमध्ये निद्रानाश ही एक समस्या आहे.
याकडे दुर्लक्ष न करता त्याचे वेळेवर व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या हृदयरुग्णांमध्ये निद्रानाशाच्या समस्येचे निदान करणेही आवश्यक आहे, जेणेकरून तीव्रता टाळता येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Heart Disease | latest study says insomnia causes heart disease know how to how to prevent heart problems

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Disha Patani Bold Photos | दिशा पाटनीनं मारली हाफ सेंचुरी, 50 मिलियन फॉलोवर्स झाल्यामुळं अभिनेत्रीनं शेअर केला बोल्ड फोटो

Pune Crime | शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढवा परिसरातील एका मॉलच्या मॅनेजरवर विनयभंगाचा गुन्हा

 

Related Posts