IMPIMP

High BP | आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे ‘हाय ब्लड प्रेशर’; बचावासाठी सेवन करा ही ३ फळे

by nagesh
High BP | fruits for high blood pressure bp control tips orange banana apple

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – भारतात हाय ब्लड प्रेशरच्या (High BP) रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. कारण येथील लोक खारट पदार्थ जास्त खातात. खारट पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे या समस्या उद्भवतात. याशिवाय जे लोक जास्त तेलकट किंवा प्रक्रिया केलेले अन्न खातात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. त्यामुळे ब्लॉकेज होऊन रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत रक्त हृदयापर्यंत (High BP) पोहोचण्यासाठी खूप जोर द्यावा लागतो, याला हाय बीपी म्हणतात (Fruits For High Blood Pressure).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ब्लड प्रेशर कंट्रोल करणारी फळे
जेव्हा ब्लड प्रेशर वाढते तेव्हा हृदयाचे आजार सुरू होतात. यात हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल्स डिसीजचा समावेश आहे. सहसा, तणावात किंवा तणावाखाली हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते, अशावेळी लोक खूप चिडतात. कोणती ३ फळे खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते, ते जाणून घेऊया. (High BP)

 

१. केळी
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी केळी जरूर खावी, हे एक सामान्य फळ आहे आणि अनेकांना ते आवडते. या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आढळते, ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या कमी होते.

२. संत्रे
इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण संत्री खातो, कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते, परंतु ते आंबट फळदेखील आहे ज्यामध्ये सिट्रस अ‍ॅसिड असते आणि ते ब्लड प्रेशर वाढण्यास प्रतिबंधित करते.

 

३. सफरचंद
सफरचंद हे अतिशय आरोग्यदायी फळ आहे, रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही,
हे आपण अनेकदा मोठ्यांकडून ऐकले असेल.
हे अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात,
तसेच ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी हे एखाद्या औषधापेक्षा कमी नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High BP | fruits for high blood pressure bp control tips orange banana apple

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Benefits of Onion | ‘या’ जबरदस्त उपायाने केसांना मिळेल नवजीवन, होतील दाट आणि लांबसडक

MNS Chief Raj Thackeray | ‘बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर…’, राज ठाकरेंनी तरुणांना केलं ‘हे’ आवाहन

 

Related Posts