IMPIMP

High cholesterol | शरीराच्या ‘या’ 3 भागातील वेदना असू शकतात हाय कोलेस्ट्रॉलचा संकेत

by nagesh
 High cholesterol | severe pain in these 3 areas of-the body could be a symptom of high cholesterol

सरकारसत्ता ऑनलाइन – High cholesterol | शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी (Cholesterol Level) वाढणे धोक्याचे लक्षण आहे. निरोगी पेशी तयार करण्यासाठी काही प्रमाणात कोलेस्टेरॉल आवश्यक असते, परंतु जर ही पातळी नियंत्रणाबाहेर गेली तर सावध राहणे चांगले. (High cholesterol)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

अतिशय धोकादाय हाय कोलेस्टेरॉल
धमन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होण्याची कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसत नाहीत, परंतु हे खूप धोकादायक आहे. हाय कोलेस्टेरॉलसह, रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधून पुरेसे रक्त जाणे कठीण होते. कधी-कधी गुठळी तयार होऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक (Heart Attack, Stroke) होऊ शकतो. (High cholesterol)

 

संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
मायो क्लिनिकनुसार, पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) मुळे तुमचे कूल्हे, मांड्या किंवा मांडीच्या मसल्सच्या मांसपेशीमध्ये वेदना होऊ शकतात. यात सामान्यतः पाय किंवा हातांना पुरेसा रक्त प्रवाह होत नाही. म्हणूनच कोलेस्टेरॉल लेव्हलवर लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण ते एथेरोस्क्लेरोसिसचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे PAD होतो.

 

असे केल्यास वाढेल त्रास
जर तुम्ही चालणे किंवा पायर्‍या चढणे यासारख्या हालचाली करत असाल तर या काळात वेदना वाढू शकते. ही स्थिती तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते आणि अनेक दैनंदिन हालचालींमध्ये व्यत्यय आणू शकते. (High cholesterol)

 

इतर संकेत ज्याकडे दुर्लक्ष करू नये

पाय सून्न होणे किंवा कमजोरी
पाय किंवा पंजामध्ये कमजोर पल्स किंवा पल्स नसणे
पायांची त्वचा चमकणे
पायांच्या त्वचेचा रंग बदलणे
पायाच्या नखांची मंद वाढ
पायाची बोटे, पंजे किंवा पायाला सूज जी बरी होत नाही
हाताचा वापर करताना वेदना. लिहिताना, विणकाम करताना किंवा इतर गोष्टी करताना वेदना
इरेक्टाईल डिसफंक्शन
पायांवरचे केस गळणे किंवा मंद वाढ

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हाय कोलेस्टेरॉलचा धोका कसा कमी करायचा?
कोलेस्टेरॉल वाढण्याची अनेक कारणे आहेत. खराब जीवनशैलीपासून ते इतर मेडिकल कंडिशन्सपर्यंत अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट्सऐवजी हिरव्या भाज्या, निरोगी आणि हायड्रेट करणारी फळे, फायबरयुक्त धान्ये खा.

दररोज व्यायाम करा, दररोज फक्त अर्धा तास वॉक केला तरी चालेल.

धूम्रपान सोडा आणि मद्यपान देखील कमी करा. निरोगी वजन राखा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High cholesterol | severe pain in these 3 areas of-the body could be a symptom of high cholesterol

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा खून, पिंपरीतील बिल्डरकडे मागितली होती 20 कोटीची खंडणी

Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटची तब्बल 1 कोटींची फसवणूक

 

Related Posts