IMPIMP

Hindustan Unilever (HUL) | ‘हे’ शॅम्पू वापरणे ताबडतोब बंद करा, कॅन्सरचा धोका असल्याने कंपन्याने उत्पादने घेतली मागे

by nagesh
Hindustan Unilever (HUL) | hindustan unilever news dove other unilever dry shampoos recalled over cancer risk

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन  – Hindustan Unilever HUL | ड्राय शॅम्पूमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढत असल्याच्या वृत्तामुळे युनिलिव्हर कंपनीने आपली अनेक एरोसोल ड्राय शॅम्पू उत्पादने माघारी घेतली आहेत. यामध्ये डव्ह, नेक्सस, ट्रेसमे आणि टिग्गी या शॅम्पू उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेले बेन्झिन सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. Hindustan Unilever (HUL)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऑक्टोबर 2021 च्या आधी बनवण्यात आलेले युनिलिव्हरचे एरोसोल ड्राय शॅम्पू मागे घेण्यात आले आहेत. या आधी जॉन्सन अँड जॉन्सन, अ‍ॅजवेल पर्सनल केअर या कंपन्यांनी त्यांच्या गेल्या दीड वर्षातील एरोसोल सनस्क्रिन आणि इतर प्रोडक्ट मागे घेतले होते. त्या अतिरिक्त अ‍ॅन्टिपार्सिपिरेंट्स देखील मागे घेण्यात आले आहेत. यामध्ये बेंन्झिन सापडल्याने ही सर्वच उत्पादने मागे घेण्यात आली होती. Hindustan Unilever (HUL)

 

ड्राय शॅम्पूचा वापर केस न भिजवता सफाईसाठी वापरता येतो. ड्राय शॅम्पू पावडर किंवा स्प्रेच्या स्वरुपात बाजारात मिळतो. स्टार्च किंवा अल्कोहोल मिश्रित हा शॅम्पू केसांवर जमा झालेले तेल आणि ग्रीसची सफाई करतो आणि त्याला दाट करतो. काही ड्राय शॅम्पूमध्ये एरोसोल स्प्रे असतो.

 

ड्राय शॅम्पूमध्येमध्ये बेन्झिन असते आणि ते शॅम्पूच्या माध्यमातून बेन्झिन शरीरात गेल्यास ब्लड कॅन्सर, ल्यूकेमिया आणि ब्लड डिसॉर्डचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या उत्पादनांमध्ये बेन्झिन सापडले आहे,
ती उत्पादने माघारी घेण्यात आली आहेत. यूनिलिव्हर कंपनीने डव्ह ड्राय शॅम्पू वॉल्यूम अँड फुलनेस, डव्ह ड्राय शॅम्पू कोकोनट,
डव्ह ड्राय शॅम्पू फ्रेश अँड फ्लोरल, नेक्सस ड्राय शॅम्पू रिफ्रेशिंग मिस्ट, नेक्सस एनर्जी, फोम शॅम्पू अँड रिवाइव्ह,
सुआव ड्राय शॅम्पू हेयर रिफ्रेशर, ट्रेस्मे ड्राय शॅम्पू वॉल्यूमायजिंग आणि बेड हेड रॉकाहोलिक डर्टी सीक्रेट ड्राय शॅम्पू ही
उत्पादने माघारी घेतली आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सप्टेंबर महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
उत्पादनाच्या पद्धतीत दोष असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई केली.
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईमधील मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा
परवाना रद्द केला आहे. पुणे आणि नाशिक येथील या पावडरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
मात्र त्यामध्ये काही धोकादायक पदार्थ आढळल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन बेबी
पावडरचा परवाना रद्द केला. या पावडरचे पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे.

 

 

Web Title :- Hindustan Unilever (HUL) | hindustan unilever news dove other unilever dry shampoos recalled over cancer risk

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अफूची विक्री करणाऱ्याला अटक, चंदननगर परिसरात कारवाई

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांना मनसेचा सवाल, पक्षाच्या पदाधिकार्‍याने महिलेला अमानुष मारहाण केल्यावर आता गप्प का?

Pune Crime | सराईत गुन्हेगाराने फोडली डोक्यात बियरची बाटली; धनकवडीत गाड्यांची तोडफोड करीत माजवली दहशत

 

Related Posts