IMPIMP

Pune Crime | अफूची विक्री करणाऱ्याला अटक, चंदननगर परिसरात कारवाई

by nagesh
Pune Crime News | Tanzanian national arrested by crime branch for drug trafficking again on bail; 7 lakh worth of cocaine seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Crime | अंमली पदार्थ्याचा (अफूची बोंडे) साठा  बाळगून त्याची विक्री करत असलेल्या एकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६० हजार रूपये किंमतीचा ६ किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महिराम मनाराम बिष्णोई (वय 28, रा. अगरवाल हॉस्पीटल समोर, चंद्रभागा बिल्डींग चंदननगर, मुळ रा. लोआवट, जि. जोधपुर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात (Chandan Nagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहत्या घरी अफुच्या बोंडांचा चुरा ठेवून त्याची विक्री करत असल्याची
माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Police Inspector Rajendra Landge) यांना
मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक (गुन्हे) रविंद्र कदम (Police Inspector Ravindra Kadam),
सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे, उपनिरीक्षक मुळूक,  अविनाश संकपाळ, पोलीस नाईक महेश नानेकर,
विकास कदम, शेखर शिंदे, गणेश हांडगर, अनप सांगळे यांच्यासह पथकाने बिष्णोई याच्या घरावर छापा टाकून
अफूचा साठा जप्त केला. त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने २८ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी
सुनावली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रविंद्र कदम करीत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Opium seller arrested, action taken in Chandannagar area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत गुन्हेगाराने फोडली डोक्यात बियरची बाटली; धनकवडीत गाड्यांची तोडफोड करीत माजवली दहशत

Pune Crime | वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन 5 लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चौघा तोतया पत्रकारांना अटक, महिला संपादकासह 6 जणांवर FIR

BJP MLA Nitesh Rane | बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे पोलिसांवर भडकले

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदार भाजपमध्ये जाणार? राष्ट्रवादीचा मोठा दावा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे ‘एका दगडात दोन पक्षी’, गडचिरोलीत नक्षलवाद्यांना इशारा देताना उद्धव ठाकरेंवर देखील साधला निशाणा

 

Related Posts