IMPIMP

Hyderabad Minor Girl Rape Case | खळबळजनक ! हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर मर्सिडिजमध्ये सामूहिक बलात्कार, 5 आरोपींना अटक; आरोपीमध्ये आमदाराच्या मुलाचा समावेश

by nagesh
Pune Crime | Shocking! Rape of a young woman studying law by luring her into marriage; Kasba Pethe incident in Pune

हैदराबाद : वृत्तसंस्था Hyderabad Minor Girl Rape Case | हैदराबादमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये महाविद्यालयीन मुलांनी सामूहिक बलात्कार (Hyderabad Rape Case) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात (Hyderabad Minor Girl Rape Case) सर्व पाच आरोपींना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या आरोपींमधील तीन आरोपी अल्पवयीन असल्याचं उघड झालं आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे राजकीय संबंध असल्याचे समोर येत आहे. या आरोपींमध्ये एका आमदाराच्या मुलाचा (MLA Son) समावेश आहे. तर इतरही आरोपी हाय प्रोफाईल (High Profile) असल्याचे म्हटलं जात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बुधवारी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात (Jubilee Hills Police Station) नोंदवलेल्या हायप्रोफाईल गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी (Hyderabad Police) तांत्रिक तपास करुन 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना शनिवारी घडल्याचं समोर येत आहे. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध IPC 376, 354, 323, 09, 10 आणि पॉक्सो कायदा (Pocso Act) 2012 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. 17 वर्षीय पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (Hyderabad Minor Girl Rape Case)

 

काय आहे प्रकरण ?
पीडितेच्या वडिलांनी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 28 मे रोजी त्यांची मुलगी एका पार्टीला गेली होती. अम्नेशिया अँड इनसोम्निया पब (Amnesia and Insomnia Pub), रोड नंबर 36, जुबली हिल्स इथे मुलीचे मित्र सूरज आणि हादी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी तिला आमंत्रित केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेसोबत पार्टीमध्ये एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सध्या पीडितेने फक्त एका आरोपीची ओळख पटवून त्याचं नाव सांगितलं आहे. हा आरोपी अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, संध्याकाळी 5.30 च्या सुमारास काही लोक माझ्या मुलीला लाल रंगाच्या मर्सिडीज कारमधून (Mercedes Car) पबच्या बाहेर घेऊन गेले.
या दरम्यान एक इनोव्हा कारही (Innova Car) बाहेर आली.
कारमधील लोकांनी माझ्या मुलीशी गैरवर्तन केले. तेव्हापासून माझी मुलगी शॉकमध्ये आहे.
सध्या तिच्या संपूर्ण घटनेचा खुलासा करु शकलेली नाही.
या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Hyderabad Minor Girl Rape Case | Hyderabad Minor Girl Rape Case all five accused arrested by police three minor political connection

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | चर्चा तर होणारच ! राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले – ‘येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री आपलाच असणार’

Sara Sachin Tendulkar | साराने पोस्ट केली हृदयस्पर्शी कहाणी ! तब्बल 10 वर्ष त्रास सहन केला.. ‘अखेर’

PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! घरबसल्या काढू शकता पैसे

 

Related Posts