IMPIMP

PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! घरबसल्या काढू शकता पैसे

by nagesh
Modi Government | cabinet approves interest subvention on short term agriculture loan upto rs 3 lakhs other decisions

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPM Kisan Yojana | टपाल विभागाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकर्‍यांना मिळणारी रक्कम सहजपणे मिळावी यासाठी उपक्रम सुरू केला आहे. टपाल विभागाच्या मदतीने शेतकरी आता ’पीएम किसान सन्मान निधी’ चे पैसे त्यांच्या घरी प्राप्त करू शकतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आता एटीएम किंवा बँकेत जाण्याची नाही गरज !
वाराणसी विभागाचे पोस्टमास्टर जनरल कृष्ण कुमार यादव म्हणाले,
किसान सन्मान निधीमधून पैसे काढण्यासाठी शेतकर्‍यांना बँकेच्या शाखेत किंवा एटीएममध्ये जावे लागते आणि ग्रामीण भागात ते अवघड आहे.
शेतकर्‍यांना ते सहज प्राप्त व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

के. के. यादव म्हणाले की, पीएम किसान सन्मान निधीचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ मिळावा यासाठी पोस्ट विभाग ’आपका बँक, आपके द्वार’ मोहीम सुरू करत आहे.

 

असे काढू शकता किसान सन्मान निधीचे पैसे
त्यांनी सांगितले की, शेतकरी घरबसल्या आधारसोबत जोडलेल्या खात्यातून आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) सह बँक खात्यातून किसान सन्मान निधीचे पैसे काढू शकतात.
त्यासाठी टपाल प्रतिनिधी त्यांच्या घरी येणार आहे.

ही मोहीम 4 जूनपासून सुरू होणार असून 13 जूनपर्यंत चालणार असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, पात्र शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात जे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात.
शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्षातून तीनदा दोन हजार रुपये पाठवले जातात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PM Kisan Yojana | farmers will be able to withdraw money received under pm kisan samman nidhi at home

 

हे देखील वाचा :

Mouth Ulcers | तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी ‘ही’ सोपी पावले उचला; जाणून घ्या

Vrikshasana | वृक्षासनामुळे मूतखड्याचा त्रास होतोय कमी, जाणून घ्या या फायदे

PMJJBY | 330 रुपयांच्या विमा योजनेवर नवीन निर्णय, 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा !

 

Related Posts