IMPIMP

ICC Player of the Month | आयसीसीकडून नोव्हेंबरचे मानांकन जाहीर; ‘या’ 3 खेळाडूंत भारतीयाचा नाही समावेश

by nagesh
ICC Player of the Month | jos buttler adil rashid and shaheen shah afridi have been nominated by the icc for november player of the month

सरकारसत्ता ऑनलाईन  – ICC Player of the Month | आयसीसीने 3 खेळाडूंना नोव्हेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी नामांकित केले आहे. ज्यामध्ये इंग्लंडच्या दोन, तर पाकिस्तानच्या एका खेळाडूचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. या तिघांपैकी एकाला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे. या यादीमध्ये इंग्लंडचा जोस बटलर, आदिल रशीद आणि पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे. विशेषमध्ये या यादीत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आले नाही. आता या तिघांपैकी कोणाला हा पुरस्कार भेटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या तिघांच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. (ICC Player of the Month)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1) जोस बटलर (इंग्लंड)

इंग्लडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलरने यंदाच्या वर्षी जबरदस्त कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याच्या संघाला आयसीसी पुरुषांचा टी-20 विश्वचषक जिंकता आला. जोस बटलरने या महिन्याची सुरुवात न्यूझीलंडविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकून केली होती. बटलरने भारताविरुद्ध उपांत्य फेरीतील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. जिथे त्याने 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अ‍ॅलेक्स हेल्ससह 49 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या होत्या. (ICC Player of the Month)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2) आदिल रशिद (इंग्लंड)

आदिल रशिदने टी- 20 क्रिकेटमध्ये जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. त्याने टी- 20 क्रिकेटच्या फायनलमध्ये बाबर आझम आणि मोहम्मद हॅरिस या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेऊन टीमला विजयी बनवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

 

 

3) शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान)

टी-20 विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने विरोधी संघावर
आपला दबाव निर्माण केला होता. त्याने महिनाभरात 7.30 च्या प्रभावी सरासरीने दहा विकेट्स घेतल्या आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 22 धावांमध्ये 4 विकेट घेत पाकिस्तानला फायनलमध्ये पोहोचवण्यात
मोलाची भूमिका पार पाडली होती. मात्र, दुर्दैवाने दुखापतीमुळे त्याला फायनलच्या सामन्यात मैदानाबाहेर जावे
लागले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- ICC Player of the Month | jos buttler adil rashid and shaheen shah afridi have been nominated by the icc for november player of the month

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | ‘या भानगडीत न पडता दत्त उपासना करावी’; नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांचा शरद पवारांना टोला

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना

 

Related Posts