IMPIMP

Income Tax Return | कोणत्या लोकांना असते ITR Form-1 ची आवश्यकता, कशी आहे तो ऑनलाइन भरण्याची पद्धत; येथे जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

by nagesh
Income Tax Return | how to file income tax return using itr form1

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Return | जर तुम्ही ई-फायलिंग पोर्टलद्वारे आयटीआर ऑनलाइन फाइल (online ITR filing) करणार असाल, तर कोणता फॉर्म निवडायचा हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. प्राप्तीकर विभाग चुकीच्या फॉर्मसह दाखल केलेला आयटीआर रद्द करतो. आयटीआर पोर्टलवर, तुम्हाला दोन फॉर्म मिळतील – आयटीआर फॉर्म-1 (ITR Form 1) आणि आयटीआर फॉर्म-4 (ITR Form 4). सध्या आपण आयटीआर फॉर्म 1 ची माहिती घेणार आहोत. (Income Tax Return)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आयटीआर फॉर्म-1 ला ’सहज’ असेही म्हणतात. ज्या करदात्यांचे उत्पन्न केवळ पगार, घराच्या मालमत्तेतून किंवा व्याजातून येते त्यांना त्यांचा प्राप्तीकर रिटर्न भरण्यासाठी ITR Form-1 वापरावा लागतो. ज्यांचे एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना हा फॉर्म भरावा लागेल. बहुतेक लोक आयटीआर फॉर्म-1 (ITR Form-1) द्वारे प्राप्तीकर रिटर्न भरतात.

 

जेव्हा तुम्ही ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन आयटीआर फॉर्म-1 निवडता, तेव्हा वेबसाइटवर दिलेल्या फॉर्ममध्ये तुमचा तपशील आधीच भरलेला असतो. पण तरीही, एकदा तुम्ही ती माहिती व्यवस्थित तपासा. कारण पोर्टलवर आधीच दाखल केलेली माहिती कधीकधी चुकीची असू शकते. (Income Tax Return)

 

ITR-1 मध्ये कोणती माहिती द्यावी लागेल
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पगारातून मिळणारे उत्पन्न, हाऊस प्रॉपर्टीद्वारे मिळणारे उत्पन्न, व्याज किंवा डिव्हिडंटचे उत्पन्न द्यावे लागते. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे या गोष्टींव्यतिरिक्त उत्पन्नाचा कोणताही अन्य स्रोत असेल तर तुम्ही रिटर्न भरण्यासाठी आयटीआर फॉर्म-1 वापरू शकत नाही.

 

या कागदपत्रांची असते आवश्यकता
आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक खात्याचे तपशील, उत्पन्नाचा पुरावा, गुंतवणुकीचे तपशील आणि इतर उत्पन्नाचे पुरावे असणे आवश्यक आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे. जर तुमचे पॅन आणि आधार लिंक नसेल तर तुम्ही आयटीआर दाखल करू शकणार नाही. तुमचा ईमेल आयडी प्राप्तीकर पोर्टलवर देखील अपडेट केलेला असावा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोण दाखल करू शकत नाहीत आयटीआर-1

– 50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या व्यक्ती

आरएनओआर आणि आरएनआय

ज्या लोकांकडे एकापेक्षा जास्त घरे आहेत

लॉटरी, घोड्यांच्या शर्यती किंवा कायदेशीररित्या खेळलेल्या जुगारातून कोणतेही उत्पन्न मिळत असेल

शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन यांच्या विक्रीतून अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफा मिळाला असेल

कृषीमधून उत्पन्न 5000 पेक्षा जास्त असेल

जर उत्पन्न व्यवसाय आणि नोकरी या दोन्हीतून येत असेल

बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी टीडीएस कापला गेला असेल.

परदेशी कंपनीत कोणतीही मालमत्ता असेल

ज्या लोकांनी असूचीबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल

एखाद्या कंपनीचे संचालक असाल किंवा परदेशात बँक खाते असेल

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्टेप बाय स्टेप असा दाखल करा आयटीआर

तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा

तुमच्या डॅशबोर्डवर, ई-फाइल, इन्कम टॅक्स रिटर्न, फाईल इन्कम टॅक्स रिटर्न वर क्लिक करा.

असेसमेंट वर्ष निवडा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.

ऑनलाइन फाइलिंगचा पर्याय निवडा आणि पुढे जा वर क्लिक करा.

जर तुम्ही आधीच इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल आणि तो सबमिशनसाठी प्रलंबित असेल, तर फायलिंग पुन्हा सुरू करा वर क्लिक करा. तुम्हाला आधीच सेव्ह केलेले रिटर्न रद्द करायचे असल्यास आणि नव्याने रिटर्न फाइल करायचे असल्यास, नवीन फाइलिंग सुरू करा वर क्लिक करा.

प्राप्तीकर रिटर्नचा प्रकार निवडा. तुम्हाला कोणता आयटीआर फाइल करायचा याची खात्री नसल्यास, तुम्ही पोर्टलद्वारे शोधू शकता.

तुम्हाला कोणता आयटीआर फॉर्म फाइल करायचा आहे हे तुम्हाला माहीत असेल तर ड्रॉपडाउनमधून लागू असलेला इन्कम टॅक्स रिटर्न निवडा आणि आयटीआरसह पुढे जा वर क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रांची यादी लक्षात ठेवा आणि ’लेट्स गेट सार्टेड’ वर क्लिक करा.

तुम्हाला लागू होणारे आयटम निवडा आणि सुरू ठेवा क्लिक करा.

अगोदर भरलेल्या डेटाचे पुनरावलोकन करा आणि आवश्यक असल्यास ते संपादित करा.

आवश्यक असल्यास इतर तपशील भरा आणि कन्फर्म करा वर क्लिक करा.

तुमचे उत्पन्न आणि कपातीचे तपशील वेगवेगळ्या विभागांमध्ये एंटर करा. फॉर्मचे सर्व कॉलम पूर्ण आणि व्हेरिफाय केल्यानंतर, पुढे जा वर क्लिक करा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला कराची माहिती दिली जाईल. जर गणनेवर आधारित कर दायित्व असेल, तर तुम्हाला तळाशी ’Pay Now’ आणि ’Pay Later’ चे पर्याय मिळेल.

जर कोणतेही कर दायित्व नसेल तर ’नो डिमांड / नो रिफंड’ वर क्लिक करा आणि जर तुम्ही रिफंडसाठी पात्र असाल, तर कर भरल्यानंतर प्रीव्ह्यू रिटर्नवर क्लिक करा. तपासल्यानंतर तुमचा तपशील सबमिट करा.

प्रीव्ह्यू आणि सबमिट यूअर रिटर्न पेजवर डिक्लरेशन चेक-बॉक्स निवडा आणि ’प्रोसीड टू व्हॅलिडेशन’ वर क्लिक करा.

व्हेरिफिकेशननंतर तुमचे रिअसेसमेंट आणि रिटर्न सबमिट करा.

ई-व्हेरिफिकेशन पेजवर तो पर्याय निवडा ज्याच्या माध्यमातून तुम्ही रिटर्न ई-व्हेरिफाय करायचा आहे. आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.

एकदा तुम्ही तुमच्या रिटर्नचे ई-व्हेरिफिकेशन केल्यानंतर, ट्रांजक्शन आयडी आणि रिसिट नंबरसह एक यशस्वी संदेश समोर येतो.

तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर नोटीफिकेशन देखील मिळेल.

 

Web Title :- Income Tax Return | how to file income tax return using itr form1

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शिवसेनेचे माजी खा. शिवाजी आढळराव पाटलांना हातपाय मोडण्याची धमकी, 17 जणांवर FIR

Multibagger Penny Stocks | जलद रिटर्न ! 36 पैशांचा शेअर झाला 2380 रुपयांचा, 1 लाख लावले असते तर 65 कोटी मिळाले असते!

Pune Pimpri Crime | “D-Mart’चा लाखो रुपयांचा माल टेम्पोमधून चोरीला

 

Related Posts