IMPIMP

Indian Railways | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना कधीपासून मिळेल सूट? रेल्वे मंत्र्यांनी संसदेत दिले उत्तर

by nagesh
Indian Railways | from when senior citizen to get concession again in indian rail Railway Minister Ashwini Vaishnav

नवी दिल्ली : वृत्त संस्थाIndian Railways | ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) रेल्वे प्रवास भाड्यात मिळणारी सूट पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत रेल्वेमंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी संसदेत (Parliament) माहिती दिली. ज्या लोकांना कोरोना संसर्गापूर्वी सूट मिळत होती, परंतु आता मिळत नाही, त्यांच्यासाठी ही बातमी खुपच नाराज करणारी आहे. (Indian Railways)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत म्हटले की, तिकिट भाड्यात काही श्रेणीच्या लोकांना देण्यात येणारी सूट किंवा सवलत पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. रेल्वेमंत्र्यांनी म्हटले की, कोविडमुळे सर्व श्रेणींतील प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सवलती परत घेतल्या होत्या आणि त्या पुन्हा सुरू करण्यावर कोणताही विचार करण्यात आलेला नाही. (Indian Railways)

कोरोना दरम्यान परत घेतली होती सूट

कोरोना महामारी दरम्यान देशभरात लॉकडाऊन (Lockdown) लावला होता. तत्पूर्वी 20 मार्च 2020 पासून पुढील आदेशापर्यंत रेल्वे भाड्यात देण्यात येणारी सवलत मागे घेण्यात आली होती. मात्र, दिव्यांगांच्या चार श्रेणी, रूग्ण आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींना अजूनही सूट मिळत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ज्येष्ठ नागरिकांना किती मिळत होती सूट?

भारतीय रेल्वेच्या सर्व ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या अगोदर तिकिटावर 50 टक्के पर्यंत सवलत मिळत होती. 60 पेक्षा जास्त वयाचे पुरुष आणि 58 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांना रेल्वेत ज्येष्ठ नागरिक प्रवर्गात ठेवले जाते.

कोरोना काळापूर्वी पर्यंत राजधानी, शताब्दी, दूरांतोसह सर्व मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पुरुषांना मुळ प्रवास भाड्यात 40 टक्के आणि महिलांना मुळ प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत दिली जात होती.

 

Web Title : Indian Railways | from when senior citizen to get concession again in indian rail Railway Minister Ashwini Vaishnav

 

हे देखील वाचा :

Satara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Pune News | भारतातील पहिलीच घटना चक्क ‘इनक्यूबेटर’मध्ये मोरांचा जन्म

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात तोतया डॉक्टर करायचा ‘हेअर ट्रान्सप्लांट’; विमाननगर परिसरातील 2 महिलांसह तिघांचा पर्दाफाश

 

Related Posts