Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाऊंडेशनकडून लोणी धामणी शाळेला स्कुल बस भेट
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाऊंडेशनकडून (Indrani Balan Foundation) आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) लोणी धामणी (Loni Dhamani) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम शाळेसाठी (Bhairavnath Vidyadham School) स्कुल बस (School Bus) भेट देण्यात आली आहे. बालन व धारीवाल कुटुंबियाकडून (Balan-Dhariwal Family) ही बस रविवारी ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून लोणी धामणी गावात अनेक विकासकामे करण्यात आली आहे. गावासाठी रुग्णवाहिका (Ambulance) भेट देण्यात आली आहे. तसेच शाळेची भव्य अशी इमारत फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्कुल बस देण्याचे आश्वासन फाऊंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी दिले होते.
त्यानुसार रविवारी इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन,
आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल (Shobha Dhariwal),
माणिकचंद ऑक्सीरिचच्या (Manikchand – Oxyrich) अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन (Janhavi Dhariwal Balan )
यांच्या हस्ते लोणी धामणी येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीकडे ही स्कुल बस सुपुर्द करण्यात आली.
यावेळी राज्याच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड,
माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळूंज. खजिनदार बाळासाहेब गायकवाड,
समन्वयक चेतन लोखंडे व अन्य पदाधिकारी व लोणी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त पी एस आय प्रकाश वाळुंज यांनी आभार मानले.
- Pune Katraj Kondhwa Road | उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी रस्त्यासाठी जागा दिल्याने
कात्रज – कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग झाला सुकर - MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)
- Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा
Comments are closed.