IMPIMP

Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा

by sachinsitapure
Ratnagiri Sindhudurg Constituency Former MP

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Nilesh Narayan Rane Quit Politics | राज्यात दसऱ्याची धामधूम सुरु असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिंरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अस्पष्ट आहे. (Nilesh Narayan Rane Quit Politics)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, असं निलेश राणे यांनी म्हटले आहे. (Nilesh Narayan Rane Quit Politics)

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं
मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही,
टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही.
कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
जय महाराष्ट्र!, असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://x.com/meNeeleshNRane/status/1716709978227290112?s=20

Related Posts