IMPIMP

Insulin Plant For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांना इन्सुलिन देते ही वनस्पती, केवळ 1 पान चावल्याने कंट्रोल होईल Blood Sugar

by nagesh
Insulin Plant For Diabetes | according to report publish in ncbi insulin plant can lower blood sugar level in diabetes patients naturally

सरकारसत्ता ऑनलाइन – Insulin Plant For Diabetes | मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आणि असाध्य रोग आहे, जो उत्तम आहार आणि जीवनशैलीद्वारे (Good Diet And Lifestyle) नियंत्रित केला जाऊ शकतो. हा आजार एकदा का कुणाला झाला की तो नियंत्रणात (Blood Sugar Level) ठेवूनच निरोगी आयुष्य जगता येते. मधुमेहावर उपचार न केल्यास शरीराच्या इतर विविध अवयवांवर त्याचे गंभीर परिणाम होतात (Insulin Plant For Diabetes).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मधुमेहाचा सर्वाधिक परिणाम किडनी, डोळे, आतडे आणि हृदयावर (Kidneys, Eyes, Intestine And Heart) होतो. मधुमेह हा ब्लड शुगर लेव्हल वाढवणारा आजार असल्याचे म्हटले जाते. ब्लड शुगर (Blood Sugar) चे प्रमाण वाढू नये यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञ, मधुमेही रुग्णांना (Diabetic Patients) सकस आहार आणि नियमित व्यायामाची (Healthy Diet And Regular Exercise) शिफारस करतात.

 

ब्लड शुगर किंवा डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली तरी त्यांचे जास्त सेवन केल्याने आरोग्याच्या इतर अनेक समस्या (Health Problems) निर्माण होऊ शकतात. काही घरगुती उपाय देखील आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. एनसीबीआयच्या अहवालानुसार, इन्सुलिन प्लांट (Insulin Plant) शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. याच्या मदतीने ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येते, जाणून घेऊया कशी (Insulin Plant For Diabetes) –

 

इन्सुलिन वनस्पती म्हणजे काय (What Is Insulin Plant) ?
Insulin वनस्पती किंवा कॉस्टस, इग्नस कोस्टेसी कुटुंबातील आहे आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करते असे मानले जाते. ही वनस्पती आशिया खंडात जास्त आढळते. ती प्रोटीन, आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्सचा (Protein, Iron And Antioxidants) चांगला स्रोत आहे. ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी या वनस्पतीचा चांगला परिणाम होतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इन्सुलिन वनस्पती कमी करते ब्लड शुगर लेव्हल (Insulin Plant Lowers Blood Sugar Level)
Insulin वनस्पतीच्या पानांमध्ये (Insulin Plant Leaves) ब्लड शुगर लेव्हल कमी करण्याची क्षमता असणारी केमिकल असतात असे मानले जाते. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक सर्व पोषक तत्व (Nutrients) या पानांमध्ये आढळतात.

इन्सुलिन वनस्पतीची पोषकतत्व (Insulin Plant Nutrients)
जर आपण वनस्पतींच्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर ते प्रोटीन, टेरपेनॉईड्स, फ्लेव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स, एस्कॉर्बिक अ‍ॅसिड,
आयर्न, बी-कॅरोटीन, कोरोसोलिक अ‍ॅसिड (Terpenoids, Flavonoids, Ascorbic Acid, Iron, B-Carotene, Corosolic Acid)
आणि इतर पोषक तत्वांचा खजिना आहे.

 

ब्लड शुगर कशी नियंत्रित करते इन्सुलिन वनस्पती (How Insulin Plant Controls Blood Sugar)
इन्सुलिन वनस्पतीच्या हिरव्या पानांमध्ये विविध पोषक तत्वांसह कोरोसोलिक अ‍ॅसिड असते.
हा घटक स्वादुपिंडातून इन्सुलिनचा स्राव वाढवून जादूचे काम करतो. ती रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे व्यवस्थापन करून स्थिती सुधारते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डायबिटिजमध्ये कसे वापरावे इन्सुलिन प्लांट (How To Use Insulin Plant In Diabetes)
असे मानले जाते की इन्सुलिन वनस्पतीचे एक पान दररोज चघळल्याने ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) ठेवता येते.
महिनाभर असे केल्याने स्थितीत लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
लक्षात ठेवा की एकापेक्षा जास्त पाने चावू नका, कारण यामुळे इतर आरोग्य धोके होऊ शकतात.
त्याची पाने तुम्ही पावडरच्या स्वरूपातही सेवन करू शकता. हे औषध दररोज फक्त एक चमचा घ्या.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Insulin Plant For Diabetes | according to report publish in ncbi insulin plant can lower blood sugar level in diabetes patients naturally

 

हे देखील वाचा :

Summer Detoxification | उन्हाळ्यात बॉडी हेल्दी ठेवणे आणि डिटॉक्सफिकेशनसाठी अशाप्रकारचा डाएट करा फॉलो

Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करणाऱ्या परप्रांतिय टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

Sharad Pawar | ‘शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना सोडणार नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

 

Related Posts