IMPIMP

IPS Saurabh Tripathi | निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींचे निलंबन मागे, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

by nagesh
IPS Saurabh Tripathi | mumbai police dcp saurabh tripathi suspension revoked big decision of shinde fadnavis govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी (Angadia Extortion Case) उकळल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात (LT Marg Police Station) दाखल झालेल्या गुन्ह्यात निलंबित (IPS Suspended) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना मोठा दिला मिळाला आहे. सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन मागे घेण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांचे निलंबन मागे घेतले आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांच्यावर गेल्या वर्षी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या निलंबनासाठी राज्याच्या गृहविभागानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावर सही करत 22 मार्च 2022 रोजी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आलं होतं.

समितीनं काय म्हटलं?

यासंदर्भात मुख्य सचिव मनोज सौनिक (Chief Secretary Manoj Saunik) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची (High Level Committee) स्थापना करण्यात आली होती. या समितीनं सौरभ त्रिपाठी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली. आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्यापेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवता येत नाही. त्यामुळे त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेण्यात येत आहे, असं या समितीने निर्णय घेताना म्हटले आहे.

गुन्हा दाखल होताच त्रिपाठी बेपत्ता

पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (DCP Saurabh Tripathi) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला तेव्हापासून ते बपत्ता होते. 16 मार्च रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) त्यांना फरार घोषित (Wanted Accused) केले आहे. त्यांना फारार घोषित केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या वसुली प्रकरणाची माहिती गृह मंत्रालयाला दिली होती. तसेच त्रिपाठी यांच्याविरोधात पुरावे सापडले होते. या प्रकरणी त्रिपाठी यांनी तक्रारदार यांना फोन करुन तक्रार मागे घेण्यास सांगितले होतं. याबाबत काही ऑडिओ क्लिपही (Audio Clip) मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

त्रिपाठींची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) सत्र न्यायालयात (Sessions Court) धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन (Police Station) स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती.

3 अधिकाऱ्यांना अटक

अंगडियाकडून वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करुन तीन अधिकाऱ्यांना अटक (Arrest) केली होती. सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम (API Nitin Kadam) आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे (PSI Samadhan Jamdade) आणि पोलीस निरीक्षक ओम वंगाटे (Police Inspector Om Wangate) या तीन अधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. वंगाटे यांच्या चौकशीतून त्रिपाठी यांचे नाव समोर आले. यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Web Title : IPS Saurabh Tripathi | mumbai police dcp saurabh tripathi suspension revoked big decision of shinde fadnavis govt

Related Posts