IMPIMP

इन्कम टॅक्स पेयरसाठी गुडन्यूज! आता ITR भरणं होणार आणखी सोपं

by nagesh
ITR | common itr form for all taxpayers income tax updates news new itr rules

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अनेकांना इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return (ITR) फाइल करणे कठीण वाटते. तुम्हाला सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याचे काम कठीण वाटत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया आणखी सोपी करणार आहे. यासाठी लवकरच एक कॉमन आयटीआर फॉर्म (ITR Form) असेल. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) त्या फॉर्मचा मसुदा जारी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या करदात्यांना टॅक्स स्लॅबनुसार (Tax Slab) आयटीआर-1 ते आयटीआर-7 मध्ये आयकर रिटर्न भरावा लागतो. आयटीआर फाइल करण्यासाठी, करदात्यांना हे फॉर्म भरणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेमुळे, आयटीआर (ITR) दाखल करण्यासाठी लागणारा वेळ वाढतो आणि पर्यायाने करदात्यांना त्रास होतो. परंतु, प्रस्तावित आयटीआर फायलिंग सिस्टमचा मसुदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम प्रॅक्टिस आधारे तयार करण्यात येत आहे. हा नवीन प्रस्ताव आयटीआर-7 वगळता सर्व विद्यमान उत्पन्नाच्या रिटर्नला एकत्रित करून एक सामान्य आयटीआर सादर करण्याचा आहे.

 

नवीन प्रक्रिया येत असली तरी सध्याचे आयटीआर-1 आणि आयटीआर-4 सुरूच राहील.
यामुळे, अशा करादात्यांना त्यांच्या सोयीनुसार सध्याचा फॉर्म (आटीआर-1 आणि आयटीआर-4) किंवा प्रस्तावित सामान्य आयटीआरमध्ये रिटर्न भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

 

आयटीआर दाखल करणे अनेक बाबतीत फायदेशीर असते. अनेक महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी इन्कम टॅक्स
रिटर्नची मागणी केली जाते. वेळेवर आणि सातत्याने आयटीआर भरल्याचा अशावेळी फायदा होतो.
अनेकदा आयटीआर न भरल्यामुळे अनेक कामे रखडतात. यासाठी अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरावा.
अन्यथा करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाकडून दंड आकारला जातो किंवा कारवाई केली जाते.
प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे आहे. आता ही प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- ITR | common itr form for all taxpayers income tax updates news new itr rules

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जण ताब्यात

Govt Jobs In Maharashtra | महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करणार; राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) प्रतिपादन

Imran Khan | पाकीस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, एका सहकाऱ्याचा मृत्यू; रॅली मध्ये घडली घटना

 

Related Posts