IMPIMP

Jitendra Awhad | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावले; म्हणाले…

by nagesh
 Jitendra Awhad | jitendra awhad reaction after prakash ambedkar statement on sharad pawar bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन-  Jitendra Awhad | शिवसेना ठाकरे गटाने आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) नुकतीच युतीची घोषणा केली. मात्र ही युती फक्त ठाकरे गट आणि वंचित पुरतीच राहणार की प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश होणार याबाबत मात्र संभ्रम आहे. त्यातच काल बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. असे खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया येणे सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावरून एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले आहे की, ‘महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली. तसेच सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही.’ असं देखील यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावले.

 

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, ‘शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवार यांनी सांगितलं होतं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं.’ असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांना सुनावले.
जयंत पाटील म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बरोबर चर्चा
करत असल्याने विधान करण्याचा अधिकार राखून ठेवतो.
पण, अजित पवार असं कुठं बोलले असतील असं वाटत नाही. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती.
राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही खेळी असू शकते.
मात्र, नंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं.
राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं.
राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली.’ असे म्हणत जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांचे ते वक्तव्य फेटाळून लावले.

 

 

Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad reaction after prakash ambedkar statement on sharad pawar bjp

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बंगला विकत घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे केली तयार; दुसर्‍याने बंगल्यावर घेतले सव्वा दोन कोटींचे कर्ज, ७५ वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Jayant Patil | अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटील यांचे खळबळजनक विधान; म्हणाले…

Pandharpur News | देवाच्या लग्नाला पावणे दोन कोटींचा सोन्याचा आहेर; सोन्याचे दोन मुकुट, सोन्याच्या बांगड्या, सोन्या -चांदीचे रुखवताची भेट

 

Related Posts