IMPIMP

WTC Final 2023 | आयसीसीने दिली मोठी अपडेट; ‘या’ दिवशी खेळवला जाणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

by nagesh
WTC Final 2023 | icc final of the world test championship will be held at the oval stadium in london from 7 to 11 june 2023

सरकारसत्ता ऑनलाईन  – WTC Final 2023 | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 7 ते 11 जून 2023 दरम्यान दुसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. हि फायनल लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या फायनलसाठी 12 जून 2023 हा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया हि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये पहिल्या स्थानी तर टीम इंडिया कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तरी ते अव्वल स्थानावर राहतील की नाही, हे बॉर्डर गावस्कर मालिका आणि न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून असणार आहे. (WTC Final 2023)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर मालिका भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार कि नाही हे ठरवणार आहे. त्यामुळे हि मालिका भारताच्या दृष्टीने खूप महत्वाची असणार आहे. कोणत्याही अडचणीशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत थेट पोहोचण्यासाठी, भारताला बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवणे गरजेचे आहे. तसेच भारताने 3-0 असा विजय मिळवला किंवा 3-1असा विजय मिळवला, तरीही भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो मात्र यावेळी त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून रहावे लागणार आहे. (WTC Final 2023)

 

फायनलसाठी एक दिवस राखीव
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
मात्र यादरम्यान एखादा दिवस पावसामुळे वाया गेला, तर निकाल लावण्यासाठी हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हरल्यानंतरही भारत खेळू शकतो फायनल
जर भारताने मालिका 3-0 ने जिंकली नाही तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतील.
कारण त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड कसोटी
मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धची कसोटी जिंकल्यास किंवा
कसोटी अनिर्णित राहिल्यास भारत जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे.

 

 

Web Title :- WTC Final 2023 | icc final of the world test championship will be held at the oval stadium in london from 7 to 11 june 2023

 

हे देखील वाचा :

IND vs AUS 1st Test | रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्ण संधी; जर ‘ही’ कामगिरी केली तर ठरणार जगातील पहिलाच कर्णधार

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इव्हॉनो इलेव्हन, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी आगेकूच

 

Related Posts