IMPIMP

Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती! 50 पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

by sachinsitapure
Executive Engineer of Mahavitaran

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj Kondhwa Road) कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार महावितरणकडून कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड (Executive Engineer Ravindra Awad) यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस (Pune Traffic Police) विभागाने ५० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. (Katraj Kondhwa Road )

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह; रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. (Katraj Kondhwa Road)

वाहतूक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचारी, रस्त्याच्या आराखड्यात येणारे महावितरणचे खांब आणि विद्युत तारा
तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही केली आहे.

वाहतूक पोलीस आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल पालकमंत्र्यांनी दोन्ही यंत्रणांचे अभिनंदन केले असून
महावितरणचे खांब आणि विद्युत तारा हटवल्यानंतर एका मार्गिकेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

Related Posts