IMPIMP

Katrina Kaif | …म्हणून कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नात नसणार सलमान खान

by nagesh
Katrina Kaif | salman khan will not attend katrina kaif and vicky kaushal wedding

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Katrina Kaif | अलीकडे अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. एवढंच नाही तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोघेही राजस्थान मधल्या रॉयल डेस्टिनेशनमध्ये लग्न करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र लग्नाला कत्रिना कैफचा खास मित्र अर्थातच प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

‘टायगर-3’ (Tiger-3 ) आणि ‘पठाण’ (Pathan) या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
पठान चित्रपट मध्ये सलमान खान शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोंबर महिन्यात होणार होती.
मात्र शाहरुख खानच्या खाजगी कारणांमुळे या चित्रपटाची शूटिंग पुढे ढकलण्यात आली असून ती डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
याच कारणामुळे सलमान खान कतरिना कैफच्या लग्नात उपस्थित राहणार नसल्याचं समोर आला आहे.

 

कतरीना कैफचा (Katrina Kaif) खास मित्र अभिनेता कबीर खान (Kabir Khan) या लग्नाला येणार असल्याने सलमान खान लग्नात सहभागी होणार नसल्याचे देखील म्हटले जात आहे.
ट्यूबलाईट चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेता आणि निर्देशकमध्ये झालेल्या वादामुळे सलमान आणि कबीर मध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कतरीनाला तिच्या लग्नाबाबत विचारल्यानंतर लोकं गेल्या पंधरा वर्षापासून आपलं लग्न लावत असल्याचं तिने म्हटलं आहे.
तर दुसरीकडे कतरिना कैफ आणि विकी कौशलने आपल्या जवळच्या मित्र-परिवारासोबत टिळाचा कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Katrina Kaif | salman khan will not attend katrina kaif and vicky kaushal wedding

 

हे देखील वाचा :

ICC च्या ‘या’ निर्णयामुळे BCCI ला मोठा दिलासा, 1500 कोटींची होणार बचत

LIC Recruitment 2021 | एलआयसीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; विमा सल्लागार पदासाठी मागवले अर्ज

Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी

 

Related Posts