IMPIMP

Rajya Sabha Elections 2022 | भाजपच्या 2 आमदारांना ‘एअरलिफ्ट’ करणार; मतदानासाठी थेट हवाई रुग्णवाहिकेने येणार

by nagesh
BJP | several eknath shindes in trs telangana bjp chief hits out at kcr

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) उद्या 10 तारखेला होणार आहे. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात मोठी चुरस लागणार हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी आप आपल्या पक्षांनी आपले आमदार मुंबईतील हाॅटेलमध्ये ठेवले आहेत. तर चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याने ते हाॅटेल ताजमध्ये नाहीत. त्यांना एअर लिफ्ट (Air Lift) करून मुंबईत आणले जाणार आहे.

 

पुण्यातील दोन्ही आमदारांना एअर लिफ्ट करुन त्यांना मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. शिवसेना उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजप आमदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यात रस्सीखेच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उद्या निवडणूक असल्याने सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहे. उद्याच्या मतदानाचे नियोजन करण्यासाठी अथवा अपक्ष आमदार आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी आघाडी आणि भाजप यांच्यात मोठी चुरस लागली आहे. (Rajya Sabha Elections 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, अशातच भाजपच्या 2 आमदारांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना मतदानासाठी कसे आणायचे, असा सवाल भाजपसमोर होता.
परंतु. या दोन्ही आमदारांना विधानभवनात आणण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.
व्हीलचेअरवरुन हे दोन्ही आमदार मतदानासाठी येणार आहेत.
जगताप यांना एअर अँम्बुलन्सने विधानभवनात आणण्यात येणार आहे, तसेच, टिळक सध्या मुंबईतच असल्याची माहिती आहे.

 

 

Web Title :- Rajya Sabha Elections 2022 | pune bjp mla mukta tilak lakshman jagtap to attend rajyasabha election 2022 via air abulance

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | देहूगाव परिसरातील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 22 वर्षीय तरुणीची सुटका

Pune University Exams | पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

POCSO ACT And Molestation Case | पॉक्सो, विनयभंगाच्या खोट्या तक्रारींना आळा बसणार, पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

 

Related Posts