IMPIMP

Pune University Exams | पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

by nagesh
SPPU News | Celebrating 'World Intellectual Property Day' at Savitribai Phule Pune University

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune University Exams | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून Savitribai Phule Pune University (SPPU) यंदाच्या सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने (Pune University Exams) होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत निर्णय रविवारी घेण्यात आला. विद्यार्थ्यांना वाढीव कालावधी आणि 2 पेपरमध्ये सुट्टी देण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना जवळपास 20 जूनपासून लेखी पद्धतीने परिक्षा देण्याचे नियोजन आहे. (Pune SPPU Exam)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे विद्यापीठाच्या निर्णयानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्याचप्रमाणे नियमित सत्राच्या परीक्षेत 2 पेपर मध्ये किमान 2 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे. तसेच, प्रत्येक पेपरला तासामागे 15 मिनिटांचा कालावधी वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिताना फायदा होणार आहे. या परीक्षांसाठी प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची माहिती आगामी काही दिवसांत विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

दरम्यान, एखाद्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आणि चालू सत्राचे विषय एकाच दिवशी येत असतील,
तर 2 पेपरमध्ये एका तासाचे अंतर ठेवण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे (Dr. Mahesh Kakade) यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या सविस्तर माहितीबाबत विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune University Exams | savitribai phule pune university sppu exams to be conducted offline

 

हे देखील वाचा :

POCSO ACT And Molestation Case | पॉक्सो, विनयभंगाच्या खोट्या तक्रारींना आळा बसणार, पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

Maharashtra MLC Elections 2022 | पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून BJP कार्यालयासमोर राडा; उमेदवारी नाकारल्याने कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

Magic Mushroom | स्ट्रेस किंवा डिप्रेशनने त्रस्त आहात का? आहारात मशरूमचा करा समावेश, जाणून घ्या फायदे

 

Related Posts