IMPIMP

KYC Deadline For Demat Accounts Extended | डीमॅट अकाऊंट होल्डर्ससाठी दिलासा ! SEBI ने वाढवली KYC ची डेडलाईन

by nagesh
SEBI | sebi bars bombay dyeing ness wadia others from securities market for up to 2 yrs imposes rs 15-75 cr fines

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाKYC Deadline For Demat Accounts Extended | बाजारात गुंतवणूक किंवा व्यापार करणार्‍यांसाठी दिलासा देणारी
बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी (KYC) केले नसेल तर आता तुमच्याकडे 30 जून 2022 पर्यंत वेळ आहे. खरेतर,
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने विद्यमान डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे केवायसी करण्याची अंतिम मुदत 30
जून 2022 पर्यंत तीन महिन्यांनी वाढवली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 मार्च 2022 होती. (KYC Deadline For Demat Accounts Extended)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

NSDL च्या परिपत्रकानुसार, केवायसी शिवाय डिमॅट खाते निलंबित करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. परंतु सेबी आणि एमआयआय सोबत झालेल्या चर्चेच्या आधारे ही मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे वन टाइम एक्सटेंशन आहे. जे डिमॅट खातेधारक आतापर्यंत त्यांच्या डिमॅट खात्याचे केवायसी करू शकले नाहीत, त्यांना केवायसी करून घ्यावे लागेल.

 

कोण – कोणती माहिती द्यावी लागेल ?
KYC करण्यासाठी, डिमॅट खातेधारकांना 6 महत्त्वाची माहिती शेअर करावी लागेल. यामध्ये तुमचे नाव, पॅन कार्ड क्रमांक, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि उत्पन्न श्रेणी यांचा समावेश आहे. जे गुंतवणूकदार कस्टोडियन सर्व्हिस वापरत आहेत, त्यांनी देखील कस्टोडियन अपडेट प्रदान करणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती अंतिम मुदतीपर्यंत अपडेट न केल्यास, गुंतवणूकदाराचे एक्सचेंज ट्रेड खाते देखील निलंबित केले जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कसे करावे KYC
डीमॅट खात्याच्या केवायसी अपडेटसाठी गुंतवणूकदार स्टॉक ब्रोकरशी संपर्क साधू शकतात.
ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटद्वारे केवायसी अपडेट देखील मिळवू शकतात.
गुंतवणूकदारांना डिपॉझिटरीज आणि एक्सचेंजेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Web Title :- KYC Deadline For Demat Accounts Extended | kyc deadline for demat accounts extended one time extension valid till june 30 ED

 

हे देखील वाचा :

Uric Acid And Ajwain | ‘या’ गोष्टीच्या केवळ एका चमच्याने कंट्रोल होईल वाढलेले यूरिक अ‍ॅसिड, तुम्ही सुद्धा अजमावून पहा

Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | डायबिटीज पेशेंटने रोज प्यावा दालचिनीचा चहा, जाणून घ्या कृती, कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल

Prabhakar Sail Post Mortem Report | आर्यन खान ड्रग्ज केसमधील पंच प्रभाकर साईलचा मृत्यु घातपातामुळे की कशामुळे…?; पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला समोर !

 

Related Posts