IMPIMP

Lifestyle | आपण रोखू शकत नाही वाढते वय, परंतु टाळू शकतो, एक्सपर्टकडून जाणून घ्या काय खाल्ल्याने त्वचा राहील तरूण

by nagesh
Lifestyle | You can't prevent aging, but you can prevent it, learn from experts what to eat to keep skin looking young

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Lifestyle | अनेकांना वाढत्या वयाची काळजी वाटते. चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसताच ते तणावग्रस्त होतात. पण वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण वाढते वय थांबवू शकत नाही, परंतु निसर्गाच्या सान्निध्यात राहून ते नक्कीच टाळता येऊ शकते. (Lifestyle)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपल्या सवयी वाढते वय रोखण्यास मदत करू शकतात. आपले वय एका निरोगी आणि पद्धतीने वाढावे, हे आपण ठरवू शकतो. एका वृत्तवाहिनी नुसार, पोषणतज्ञ लवनीत बत्रा देखील याच्याशी सहमत आहेत आणि त्यांनी याबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील जारी केला आहे.

 

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपण नैसर्गिकरित्या वाढते वय थांबवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही. पण, आपण ती प्रक्रिया मंद करू शकतो. वयाच्या ४० आणि ५० व्या वर्षीही आपण चमकदार त्वचा मिळवू शकतो.

 

असे टाळता येऊ शकते वाढते वय :

१. पपई :
पपईमध्ये पपेन एन्झाइम असते. त्यात अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. या फळामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्यात लायकोपीन असते. हे वाढत्या वयाशी लढते.

 

 

२. डाळिंब :
डाळिंबात प्युनिकलॅजिन कंपाऊंड देखील असते. हे कोलेजन टिकवून ठेवते आणि वाढते वय दिसू देत नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

३. हिरव्या पालेभाज्या :
हिरव्या पालेभाज्यांमधील क्लोरोफिल त्वचेतील कोलेजन वाढवते. यामुळे शरीरातील घटक वाढत्या वयाशी लढण्यास मदत करतात.

 

४. दही :
दही खाणे शरीरासाठी आवश्यक आहे. त्यात प्रोबायोटिक्स असतात. हे शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाचे पोषण करते.
दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड सुरकुत्या दूर करते आणि शरीरातील छिद्रे भरते. दह्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी १२ त्वचा चमकदार बनविण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेच्या पेशीही वाढतात आणि शरीरातील आर्द्रता टिकून राहते.

 

५. टोमॅटो :
टोमॅटोमध्ये लायकोपीनचे प्रमाण प्रचंड असते. यामुळे त्वचा घट्ट राहते आणि सूर्यकिरणांच्या प्रभावापासूनही संरक्षण होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-सी असते. यामुळे शरीरातील कोलेजनचे पोषण होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Lifestyle | You can’t prevent aging, but you can prevent it, learn from experts what to eat to keep skin looking young

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | परभणीत शिंदे गटात इनकमिंग सुरूच; सईद खान यांनी दिला इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात प्रवेश

Pune Pimpri Crime | महापालिकेत खोटी कागत्रपत्र देऊन वकिलाची फसवणूक, भावावर FIR; चिंचवडमधील प्रकार

 

Related Posts