IMPIMP

Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | महाराष्ट्रात आता दारूची होम डिलिव्हरी बंद; अजित पवारांनी दिली माहिती

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on stalled cabinet expansion eknath shinde devandra fadanvis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) दारूच्या होम डिलिव्हरी म्हणजे दारूच्या घरपोच सेवाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती निवळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. याबाबत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“कोविडचे प्रमाण कमी असल्याने आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती.” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही डिलिव्हरी परवानाधारक दुकानांसाठी होती. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता केसेस कमी झाल्यामुळे सरकारने होम डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. तसेच, राज्याच्या गृह विभागाने (Maharashtra Home Department) महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना (Commissioner of Excise, Maharashtra) पत्र लिहून दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. (Liquor Home Delivery Stopped In Maharashtra)

 

राज्यातील कोरोनास्थितीबाबत अजित पवार म्हणाले…
“सध्या कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचे असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे,” अजित पवारांनी सांगितले. ‘मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही,’ पवार यांनी सांगितले आहे.

 

Web Title :- Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | home delivery of liquor stopped in the state ajit pawar s announcement

 

हे देखील वाचा :

Symptoms Of Cervical | तुम्हाला सर्वाइकल झाला आहे का?; जाणून घ्या काय आहेत लक्षणे

Johnny Depp-Amber Heard | अभिनेता जॉनी डेपच्या बाजूने न्यायालयाचा निकाल; एम्बर हर्डला द्यावी लागणार तब्बल 116 कोटींची नुकसान भरपाई

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी डबल खुशखबर ! प्रमोशनसह DA बाबत सुद्धा आली मोठी अपडेट

 

Related Posts