IMPIMP

LPG Cylinder | मोदी सरकार गॅस सिलेंडरमध्ये करतंय मोठे बदल, देशातील कोट्यावधी लोकांना मिळेल फायदा; जाणून घ्या

by nagesh
LPG Cylinder | lpg gas cylinder modi government make plan to reduce weight of lpg cylinder

नवी दिल्ली : वृत्त संस्थाLPG Cylinder | मोदी सरकार (Modi Government) महिलांना दिलासा देण्यासाठी एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे. घरगुती गॅस (LPG Cylinder) सिलेंडरचे वजन 14.2 किलोग्रॅम असल्याने त्याच्या वाहतुकीसाठी महिलांना खुप त्रासाचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेता सरकार सिलेंडरचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

राज्यसभेत दिली माहिती

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी (Petroleum and Natural Gas Minister Hardeep Singh Puri) यांनी राज्यसभेत ही
माहिती दिली. यापूर्वी एका सदस्याने सिलेंडर अवजड असल्याने महिलांना होणार्‍या त्रासाचा उल्लेख केला होता. पुरी यांनी यावर उत्तर देताना म्हटले की,
महिला आणि मुलींना इतका जड सिलेंडर उचलावा लागू नये, असे आम्हाला वाटते आणि त्याचे वजन कमी करण्यासाठी विचार करत आहोत.

 

 

आतापर्यंत 8.8 कोटी कनेक्शन जारी

त्यांनी म्हटले, आम्ही एक मार्ग काढू, मग तो 14.2 किलोग्रॅम वजन कमी करून पाच किलोग्रॅमचा बनवणे असो किंवा इतर पद्धत…आम्ही असे
करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. याशिवाय पेट्रोलियम आणि नैसेर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, तेल पणन कंपन्यांनी देशभरात उज्ज्वला
2.0 आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत 8.8 कोटी एलपीजी कनेक्शन (LPG Cylinder) जारी केले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

2016 मध्ये सुरु झाली होती योजना

 

त्यांनी म्हटले की, देशभरातील गरीब कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर आठ कोटी एलपीजी कनेक्शन जारी करण्यासाठी 1 मे 2016 ला
पीएमयूवाय योजना सुरू केली होती आणि या योजनेचे लक्ष्य सप्टेंबर, 2019 मध्ये प्राप्त केले.

 

Web Title : LPG Cylinder | lpg gas cylinder modi government make plan to reduce weight of lpg cylinder

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर ऊर्फ लालबादशाह खून प्रकरणात तिघांना अटक

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पती-पत्नीला दर महिना देईल 5000 च्या जवळपास रक्कम, फक्त करावी लागेल इतकी गुंतवणूक

 

Related Posts