IMPIMP

Maharashtra Assembly Session | ‘महाराष्ट्राचे प पू’ म्हणणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंचं जाहीर आव्हान, म्हणाले…

by nagesh
 Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | aaditya thackeray says people dont go to eknath shinde rally

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Assembly Session | राज्याच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज शिंदे गटाकडून (Shinde Group) आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत आंदोलन केले. यात आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा करण्यात आला. तसेच आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ नेहमीच चुकली, असा टोला अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session) शेवटच्या दिवशी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान लगावला. यावर आता आदित्य ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटातील आमदारांची कीव येते. तुमच्यात हिंमत असेल तर आधी राजीनामा (Resignation) द्या. चला मीही राजीनामा देतो आणि निवडणुकीला (Election) सामोरा जातो, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मला त्यांची कीव येते

शिंदे गटाच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर (Maharashtra Assembly Session) आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात (Vidhan Bhavan) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसे उभे केले आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागते. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते.

 

मी तर म्हणतो की विधानसभा…

यावेळी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देऊन थेट निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.
ते म्हणाले, 40 लोकांनी राजीनामा द्यावा, मीही देईन. आपण निवडणूका लढवू.
मी तर म्हणतो की विधानसभा बरखास्त करा, संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लावा. होऊन जाऊ दे एकदाचं, असं आव्हान त्यांनी दिले.
ज्याची भीती वाटते, त्याच्यावर टीका जास्त केली जाते.
पायऱ्यांवर उभे असणाऱ्यांची कीव येते. त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदाची.
ती मिळाली नाही, म्हणून त्यांना श्रेष्ठींना खुश करण्यासाठी माझ्याविरोधात बोलायला लागत आहे.

 

Web Title :- Maharashtra Assembly Session | Aditya thackeray criticize rebel mlas over vidhan sabha session

 

हे देखील वाचा :

Maharashtra State Backward Commission | राज्यातील भटक्या विमुक्तांचा केंद्राच्या डीएनटीमध्ये समावेश; राज्य मागास आयोगाच्या सदस्यांची माहिती

Pune Crime | नियोजित पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तरुणीचा केला विनयभंग; शिक्षकाला सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक

Pune News | पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांची वर्षातून 3 वेळा तपासणी

 

Related Posts