IMPIMP

Maharashtra Assembly Session | ‘पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर’, ‘युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली’; आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या निशाण्यावर

by nagesh
Maharashtra Assembly Session | shivsena shinde camp mlas target shivsena leader aaditya thackeray shouting slogans against him maharashtra assembly session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Assembly Session | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार (Shinde Group MLA) आणि राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA)
एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर आजही सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर (Maharashtra Assembly
Session) सकाळीच कब्जा केला आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरु केली. लक्षवेधी बाब अशी की शिंदे गटातील आमदारांकडून यावेळी
शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya
Thackeray) यांना लक्ष्य करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकवण्यात आले.
या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला आहे.
महाराष्ट्राचे परमपुज्य (प पु) युवराज… 2014 ला 151 चा हट्ट धरुन युती बुडवली.
2019 ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी (Hindutva) विचारधारा पायदळी तुडवली.
पर्यटन (Tourism) खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर.
पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन… खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार… जनता हे खोटे अश्रू पुसणार नाही… तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही.
युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली, अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला होता.

 

शिंदे गटातील आमदारांकडून आज प्रामुख्यानं आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
आमदार घोषणाबाजी करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील याठिकाणी पोहोचले आणि विधानभवनात (Maharashtra Assembly Session) जात असताना त्यांनी आमदारांना शांततेत आंदोलन करा असा सल्ला दिला.
यानंतर ते विधानभवनात गेले.
आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटातील आमदारांनी ’50 खोके… मातोश्री ओके’, ’50 खोके… मुंबई मनपा ओके’,
‘युवराजांची दिशा नेहमीच चुकली’, अशा घोषणा दिल्या.

 

Web Title :- Maharashtra Assembly Session | shivsena shinde camp mlas target shivsena leader aaditya thackeray shouting slogans against him maharashtra assembly session

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ससूनमधील डॉक्टरांच्या नावाने रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे मागण्याचा प्रकार

Pune Crime | महिला पोलिसाशी अनैतिक संबंध, अर्धनग्न फोटो मित्रांना दाखवत केली बदनामी; पोलिस कर्मचाऱ्याला अटक

 

 

Related Posts