IMPIMP

Maharashtra Cabinet Decisions | शिंदे-फडणवीस सरकारचं पोलिसांना गिफ्ट ! महाराष्ट्र पोलिसांच्या नैमित्तिक रजेत वाढ, 7231 पदांची पोलीस भरती होणार

by nagesh
Maharashtra Police | Dussehra gift from Shinde government to police officers-employees, substantial increase in casual leave; GR left

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decisions | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील पोलिसांना दिलासा देताना राज्य सरकारने नैमित्तिक रजा वाढवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) घेतला आहे. यामुळे पोलिसांना आता एका वर्षात 12 ऐवजी 20 राजा मिळणार आहेत. तसेच राज्यातील आगामी पोलीस भरती पारदर्शकपणे करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातील पोलीस शिपाई (Police Constable) ते पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्या नैमित्तिक रजा (Casual Leave) 12 वरुन 20 करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आला. पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक राजा आणखी वाढवून 20 दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.

 

सध्या 7231 पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालक यांच्यामार्फत (DGP) पद भरतीच्या (Police Recruitment) जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारिरीक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील 20 मैदानांवर संपूर्ण तयार करा. तसेच मैदानावर कॅमेऱ्यांची यंत्रणा ठेवा. केणत्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

 

 

मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

 

1. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar) आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात (International College of Music) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार.

2. पु.ल. देशपांडे अकादमी (P.L. Deshpande Academy) मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ (उच्च व तंत्रशिक्षण-Higher and technical Education)

3. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण (वित्त विभाग-Finance Department)

4. पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या (गृह विभाग -Home Department)

5. सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

6. नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा (शालेय शिक्षण विभाग School Education Department)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

7. वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. (परिवहन विभाग-Transport Department)

8. बार्शी येथील लक्ष्मी सोपान अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी
(Lakshmi Sopan Agriculture Produce Marketing Company) या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश (पणन विभाग)

9. औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार (विधी व न्याय)

10. राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एम पी एस सी मार्फत भरणार (सामान्य प्रशासन विभाग)

11. आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना ( मदत व पुनर्वसन)

12. धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता (गृहनिर्माण विभाग)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decisions | CM eknath shinde devendra fadnavis cabinet decided to extend casual leaves to twenty and held transparent police recruitment

 

हे देखील वाचा :

Memory Booster | मुलांचा मेंदू होईल सुपर ब्रेन, अवलंबा ‘हे’ 6 जबरदस्त उपाय; मोठ्यांसाठी सुद्धा लाभदायक

Pimpri Minor Girl Rape Case | चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षाच्या वृद्धाने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Ramdas Kadam Vs Shivsena | रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात जोडे मारो आंदोलन

 

Related Posts