IMPIMP

पुण्यातील Lockdown संदर्भात अजित पवारांचं मोठं विधान ! म्हणाले…

by bali123
Ajit Pawar | what ajit pawar could not do eknath shinde has done ramdas athawales

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात महाराष्ट्र सध्या आघाडीवर आहे. देशातील ज्या 10 जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत त्यातील 9 जिल्हे महाराष्ट्रतील आहेत. यात पुण्याचाही समावेश आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही शहरांनी लॉकडाऊनलही लागू केलं आहे. अशात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका पत्रकार परिषदेत पुण्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लॉकडाऊनबद्दलही भाष्य केलं आहे. मुंबईत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

काय म्हणाले अजित पवार ?
अजित पवार Ajit Pawar म्हणाले, मोठ्या प्रमाणात कोरोनाचं संकट वाढू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढलं आहे. पालकमंत्री या नात्यानं उद्या पुण्यात लोकप्रतिनिधींना बोलवलं असून दर शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होत असते. त्या बैठकीत आम्ही निर्णय घेतो. लॉकडाऊनसंबंधी मतांतर आहे. परंतु नियमांचं पालन केलं पाहिजे यावर एकमत आहे असं पवारांनी स्पष्ट केलं.

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

‘पक्षीय राजकारण मधे न आणता हे आपल्या सर्वांवरचं संकट आहे या भावनेनं कोरोनाशी लढलं पाहिजे’
पुढं बोलताना अजित पवार Ajit Pawar म्हणाले, पक्षीय राजकारण मधे न आणता हे आपल्या सर्वांवरचं संकट आहे या भावनेनं आपण कोरोनाशी लढलं पाहिजे. आम्ही 45 वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण करण्याची मागणी केली होती. ती मान्य झाली आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. परंतु आता 45 च्या आतील अनेकांना कोरोना होत आहे. देवगिरी जिथं मी राहतो तिथं अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर 9 लोक पॉझिटीव्ह होते. आपल्याला कोरोनाचा मुकाबला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आर्थिक मदत कमी पडू न देण्याची आमची भूमिका आहे असंही पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts