IMPIMP

शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

by bali123
MNS on Sanjay Raut | the ed took direct action against the ncps bhonga mnss harsh criticism on sanjay raut

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी युपीए ( UPA ) चं नेतृत्व करण्यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानामुळं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त होतं. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मात्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. शरद पवारांच्या नावाला युपीएमध्ये कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही असंही ते म्हणाले. दिल्लीत पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

‘काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत’
संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, काँग्रेसमध्ये नाराजी वगैरे नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधींचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे. परंतु त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावी ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे असंही राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

‘युपीएची ताकद कमी झालीय, त्याचं नेतृत्व आता शरद पवार यांनी करावं’
पुढं बोलताना राऊत म्हणाले, देशात भाजपप्रणित एनडीएसमोर काँग्रेसप्रणित युपीए प्रमुख विरोधकांची भूमिका निभावत आहे. मात्र आता युपीएची ताकद कमी झाली असून नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं अशी भूमिकाही राऊत यांनी यावेळी बोलताना मांडली.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

 

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts