IMPIMP

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

by nagesh
SSC HSC Exam | 50 rupees for concession marks in class 10th and 12th exams decision of the state board of education

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – SSC HSC Exam | दहावी व बारावीच्या परीक्षेत अनेक मुलांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळतो. या गुणांमुळे अनेकदा त्यांचे एकूण १०० टक्क्यांपेक्षा जास्त होतात. हे गुण देण्यासाठी शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसेच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. मात्र, हे गुण देण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला प्रचंड कसरत करावी लागते. त्यामुळे आता सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काव्यतिरिक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (MSBSHSE) अतिरिक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत. फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेपासून हे छाननी शुल्क सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी आकारले जाणार आहेत. (SSC HSC Exam)

 

सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. यानंतर त्या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्यानंतर त्यातील त्रुटीमुळे संबंधितांशी पत्रव्यवहार करून त्रुटी काढाव्या लागतात. या सर्व प्रक्रियेसाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करून छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. (SSC HSC Exam)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्याबद्दल तसेच लोककला, क्रीडा, एनसीसी, स्काउट
व गाइड प्रकारात सहभागी झाल्याबद्दल सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात.
पण या वेळेस परीक्षेपासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी
विद्यार्थ्यांकडून 50 रुपये चलनाद्वारे किंवा रोखीने घ्यावेत आणि ते विभागीय मंडळ स्तरावर सुपूर्त करावेत,
या शिक्षण मंडळाच्या शिफारशीला परीक्षा समितीने मंजुरी दिली आहे, तर परीक्षेच्या प्रस्तावासोबतच हे छाननी
शुल्क स्वीकारावे. छाननी शुल्क न आकारता किंवा कमी शुल्क आकारून प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नयेत
याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनादेखील मंडळाने केल्या आहेत.

 

 

Web Title :- SSC HSC Exam | 50 rupees for concession marks in class 10th and 12th exams decision of the state board of education

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Mumbai High Court On Abortion | मुंबई उच्च न्यायालयाने दिली सशर्त गर्भपाताची परवानगी

Entertainment News | 2022 मध्ये ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी संपवलं त्यांचं नातं

 

Related Posts