IMPIMP

Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert

by nagesh
Rain in Pune | Against the backdrop of heavy rains, a restraining order has been issued in Gadkille, a tourist spot in Pune district

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | मागील काही दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा होती. तो पाऊस आता सक्रिय
झाला आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून काही जिल्ह्यात (Maharashtra Monsoon Update) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही दिवस
पावसाची रिपरिप सुरु आहे. मंगळवारी रात्री मुंबईसह (Mumbai) राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,
जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागात मुसळधार पाऊस कोसळला असला तरी आता राज्यात पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यातील काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून आली आहे. दरम्यान काही ठिकाणी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावासामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आता पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. तसेच, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आगामी 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, कूचबिहार, अलीपुरद्वार आणि सिक्कीम या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दक्षिण आणि नैऋत्य वाऱ्यांच्या परिणामामुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | imd monsoon update rain across maharashtra state kokan pachhim maharashtra 5 days

 

हे देखील वाचा :

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

Shobhatai Rasiklal Dhariwal | शोभाताई आर धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

 

Related Posts