IMPIMP

Maharashtra Monsoon Update | येत्या एक ते दोन दिवसात पुणे आणि परिसरात पावसाचा जोर वाढणार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by nagesh
Maharashtra Rain Update | heavy rainfall likely to continue for next three hrs over mumbai thane and parts of raigad and palghar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Monsoon Update | उद्यापासून मुंबई (Mumbai) आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवसांत पुणे (Pune) आणि परिसरातील पावसाचा (Maharashtra Monsoon Update) जोर वाढणार आहे. याशिवाय कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुढील दोन दिवसांमध्ये कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. परंतु मान्सूनने आतापर्यंत राज्यात दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. राज्यात केवळ एक टक्काच पेरणी झाली आहे. तर दुसरीकडे धरणांमधील पाणी साठी कमी होत असल्याने पाणी संकट पहायला मिळत आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

 

मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी हवामानातील बदलामुळे (Climate Change) मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला. जूनच्या मध्यापर्यंत राज्यात कोरडे वातावरण होते. मात्र, पुढील 24 तासात महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून येत्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार तर अतिमुसळधार पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अन्यथा दुबार पेरणीचे संकट येऊ शकते

राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये.
पेरणीची घाई करु नये असे मत कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे धोकादायक ठरु शकते.
तसेच दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon updates heavy rain expected in mumbai konkan and central maharashtra in two days

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण; पाहा आजचा भाव किती ?

Pune PMC News | समाज मंदिर आणि व्यायामशाळेच्या ‘त्या’ निर्णयासाठी राज्य शासनाचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दणका

Maharashtra MLC Election 2022 | ‘अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती’ – अजित पवार

 

Related Posts